Words beginning with
अ
559 entries
अ
The first vowel in the DM alphabet.
दक्षिणी मराठी अक्ष्ररमालाच पहिलच स्वर.
अ
prefUsed as a prefix to indicate negative meaning (eg. असत्य, असंभव etc).
अइतवार
nSunday. आइतवार. आदित्यवार. रविवार. भानुवार.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
रिटैर झाल नंतर एक एक दिवसीन / दरएक दिवसीन अइतवारास्कच दिसते मला!
Note
- 1. आदित्य, रवी अणी भानु, हे तीनीं सूर्याच नाव आहे अणी आदित्याच अपभ्रष्ट रूप आहे “अइत” अथवा “आइत”.
- 2. अदितीच लोंक होऊन उजलत्यामळे सूर्याला ‘आदित्य’ म्हणून नाव आल॑.
- 3. अइतवार and आइतवार are rustic forms of आदित्यवार.
- 4. Better: आइतवार.
अकटविकट
adjMonstrously huge. Hideously large.
भयंकर आकाराच. भें वाटाच एवढ॑ थोर. मोठ घोर आकाराच; अकटोविकट in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
यक्षराजा सुकेतूच लेंक ताडका / ताटका एक सुंदर पोरी होती, पण अगस्त्य ऋषीच शापामळे तिन॑ अकटविकट रूपाच राक्षसी झाली.
Note
- ताटका in Valmiki Ramayan and ताडका in Tulsidas’ Ramacharitamanas.
अकटविकट सामर्थ्य
adjOversmart. Extra cunning.
विपरीत वक्रबुद्धीच.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पाकिस्थानाच नेतालोके भारताच विरुद्ध अकटविकट सामर्थ्य दाखिवून अत्ता त्यंच देश अधोगेतांत जात आहे.
अकर्मक क्रियापद
gramIntransitive verb.
वाक्याच अर्थ पूरा कळिवाला कर्माच आवश्य नाहीते क्रियापद (व्याकरण).
Used in a sentence · वाक्य प्रयोग
निसरणे, हे एक अकर्मक क्रीयापद आहे.
व्याकरणाच नियमाप्रकार कर्ता कराच क्रियाच परिणाम दुसर॑ एक व्यक्ती अथवा वस्तूच व॑र पडल॑ नाहीतर ते क्रियापदाला अकर्मक क्रियापद म्हणतों.
अकस्मात
advUnexpectedly.
असलास्क असून.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
साळेंत मझ बरोर वाचलते मित्राला पाव्हून उदंड दिवस झाल होत॑. काल दुकानबीदीला गेलास्ताना मी तला अकस्मात पाह्यलों / प्हायलों.
अकारण
advWithout reason.
कारण नाहीस्क. विना कारण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तू कायतरीन खोडी केलासील. अकारण तुला कोणीन हाक्का मारनात / शिवा देनात.
अकाल
nUntimely.
अवेळ.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मृकंडु ऋषीच लोंक मार्कंडेयाच वय सोळा वर्ष होताना त्यंच अकाल मरण होईल म्हणून होत॑ तरीन, यमधर्माकडून ते बालऋषीला भगवान शिव वांचिवले.
अकालमरण
nUntimely death.
ल्हान आयुषांत होयाच मरण. अकालमृत्यू.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तीस वर्ष होयाच पुढे तिला कॅनसर रोग येऊन अकालमरण झाल म्हणून ऐकून मला संकट वाटल॑.
अकालमृत्यू
nUntimely death.
ल्हान आयुषांत होयाच मरण. अकालमरण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
गणितशास्त्रांत फार सामर्थ्य दाखिवलते श्रीनिवास रामानुजनाच वय बत्तीसवां वर्ष होताना त्यंच अकालमृत्यू झाल॑.
अक्कतीज
nThe Hindu festival falling next day to भाऊबीज (after Dipavali) when brothers honour sisters.
दीपावली सण झाल नंतर अणी भाऊबीज होऊन दुसर॑ दिवसी भाऊंडे बहिणींस आदर कराच सण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ बहीण विदेशांत आहे-ते-करतां अक्कतीज सणाला वर्षा-वर्षी एक हदार / हज़ार रुपे तिज बॅन्क खातांत (अक्कौन्टांत) मी घालणे आहे.
Note
- 1. अक्का (sister) + तीज (third day of the lunar fortnight).
- 2. भाऊ (brother) + बीज (the second day of the lunar fortnight).
- 3. Not to be confused with अखतीज.
अक्करे
neagerness. अति आशाच विचार.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
बाजू घरच लोकांमध्ये कायतरीं भांडा-भांडी झालतर अम्ही त्यंच विषयांत तोंड घालून अक्करे दाखिवणे चोखट / चोखोट न्हो.
Note
- from Tamil.
अक्का
nelder sister. वडील बहीण / बहिणी ; ताई / आक्का / अक्का in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) शेखराला धक्टी बहीण कोणीन नाही. एक अक्का मात्र आहे.
Note
- DMs wrongly use बहीण and बहिणी synonymously. बहीण is Sister and बहिणी is used while saying anything relating to Sister. (2) धाकटी in sm for धक्टी of DM.
अक्कि
na type of pox. शीतळा. सीतळा. एक विधाच देवी-रोग.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अगाऊच काळांत लेंकरांस अक्कि आलतर कुंभाराकडे जावून मंत्र करून हाती यंत्र बांधून येतील.
Note
- (1) कुंभार, potter. (2) शीतळा देवी is traditionally one of the principal deities of the कुंभार community, hence the connection.
अक्रम
nunlawful act. नियमाच विरुद्ध कराच काम.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
चोर्टे लोके अक्रमकार्य काहीं करनास्क असाला अम्च गामाच / गांवांच पोलीस उदंड पाह्यींगतात.
अक्रम
ndisorder. क्रमाच विरुद्ध.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मध्य-मध्य बंगळूराच पोलीस अक्रम पसराच गुंडा लोकांस धरून किलुपांत / कैदांत / कारागृहांत घालणे आहे.
अक्रा
neleven. दहाच नंतरल संख्या ; अकरा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
क्रिकेट, फुटबॉळ, हॉकी असलते खेलांत एक एक पक्षांतीन अक्रा अक्रा दन अस्तील.
अखतीज
nthe Hindu festival of Akshay-thritheeya falling on the third lunar day of the first half of Vaishakha month. अक्षयतृतीया. अक्षतृतीया.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) वैशख महिनेच शुक्लपक्षाच तृतीया दिवसी अखतीजाच सण येत॑. (2) अखतीजाच दिवसी चोखट / चोखोट काय करल॑ तरीन वर्ष पूरा अण्कीन ते वाढत जाईल म्हणून भरून लोके ते दिवसी सोनेच आभरण घेतात.
Note
- (1) from अक्षय, perpetual (prosperity) + तीज, third day of the lunar fortnight. (2) not to be confused with अक्कतीज.
अखंड
adjundivided. wholly in tact. सग्ळ॑विणी असाच. संपूर्णविणी असाच
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अखंड होऊन असलते "यु. एस. एस. आर" 1996 नंतर पंध्रा वेगळ॑-वेगळ॑ देश झाल॑.
अखंड-दिवा
nan oil lamp kept burning perpetually in front of gods' idols. देवाच विग्रहाच समोर लावून ठिवाच निरंतर दिवा. नंदादीप.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अखंड-दिवा लावाला तीळाच तेल श्रेष्ट म्हणून शास्त्रांत आहे.
अग
inda casual manner of addressing a girl or a woman. पोरींना / बायकांना बलावाच एक रीत.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ बाईलीला मी "अग" म्हणून बलावाच थोडक पणीन इष्ट नाही. "नाव सांगून बलावांत" अस सांगते.
अगत्य
advwithout fail. खंडिप. कंडिप (Tamil).
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ लेंकीच वराडाला तुम्ही येईनास्क असताने अस्ताने. अगत्य येऊनच सराम / सरांव.
Note
- खंडिप, the hyper emphasised form of कंडिप of Tamil has been well accepted in DM.
अगत्य
nessential / necessary condition or requirement. imperative. अवश्य.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तुम्च नव घराला येयाला वाट मला कळेल. वाट दाखिवाला एक मनुषाला पाठिवून देवूनच सराम अस अगत्य काहीं नाही.
अगत्य
nrequired attention. पह्जते एवढ॑ लक्ष्य / श्रद्धा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
उद्या शेवटीच परीक्षा आहे तरीन, थोडपणीन अगत्य नाहीस्क तो टी.वी. पाह्त बसलाहे.
अगरबत्ती
nincense stick. ऊदबत्ती.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कित्येक लोकांस अगरबत्तीच वास लागलतर श्वास सोडणे कष्ट होईल म्हणून त्यांस ते बरोर पडना.
अगाऊ
advin advance. beforehand. अघाऊ. पुढेच ; अघाऊ in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च दूधवाला एक महिनेच पैसे अगाऊच घेऊनटाकतो.
Note
- better अघाऊ.
अगाऊचकाळ
nearlier times. bygone times. अघाऊचकाळ. गेलते काळ.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पंतोजी लोकांना अगाऊच काळांत मिळत होतत्यास्क अत्ता मर्यादा मिळणे अप्रूप झालाहे.
Note
- (1) better अघाऊचकाळ. (2) though the root word अघाऊ of sm means "in advance or beforehand", in DM अगाऊचकाळ / अघाऊचकाळ has by usage come to mean "earlier or bygone times".
अगाध
adjprofound. deep. गाढ. तीव्र.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तत्वज्ञानांत अगाध पांडित्य असाच व्यक्तींच भाषण ऐकलतर अम्च मनांत त्यंचवर अपाप मर्यादा / बहुमान येईल.
Note
- मर्यादा is a loan word from Tamil meaning "respect".
अग्गीन
proneverything. all. अस्कीन. अस्गीन. अग्गीं. सग्ळीन. पूराहीं.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हे खोली अत्ताच खालीकरून देम॑. आंत असाच सामान अग्गीन /अस्कीन काढून बाहेर ठिवाम म्हणून खोलीच मालक मला सांगिट्ले.
Note
- (1) अख्खा in sm means "full"/"entire". (2) The word अग्गि / अग्गीं / अग्गीन appears to be a morphed version of अख्खि /अख्खीं / अख्खीन. (3) अस्कीन appears to be compound word of अस and अग्गीन morphed to अस्कीन; अस+अग्गीन = अस्गीन or अस्कीन.
अग्निकाष्ट
ncinder. पेटून उरलते कोळसा. पेटून उरलते लांकड.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
होम झालानंतर भोईं पुसताना आचारेच बोट अग्निकाष्ट लागून लासल॑.
अग्निकुंड
na fire-pit for performing sacred rites. होम कराच अग्नीच कुंड. होमकुंड.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
घरांत होम करताना भोईं (भोए) हाळ होयनास्क असाला वाळू घालून तजवर अग्निकुंड करणेच चोखट / चोखोट.
अग्निज्वाला
nflame. विस्तूच ज्वाला. विस्तूच पेट.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
यंदा / हे वर्षी अम्च गांवाच जवळच डोंगूरांत मोठ जाळ पेटून तिकडल राण पूरा जळून नाश झाल॑. दोन मैल दूरांत्सून अम्हाला अग्निज्वाला दिसत होत॑.
अग्निनक्षत्र
na particular day in summer when the temperatures are very high. सूर्याच ऊन भयंकर असाच उन्हाळाच दिवस.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हे वर्ष अग्निनक्षत्राच दिवसी मी चेन्नैंत जाऊन सांपडींगून तिकडल॑ भयंकर ऊबांत तरपडून गेलों.
अग्निपरीक्षा
nextreme ordeal to prove moral veracity and character. पवित्रता दाखिवाला कराच उग्र परीक्षा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पैसा घेवून क्रिकेट मॅचाच परिणाम बदलिवाला प्रयत्न करलते अपवादांतून चुकाला कित्येक लोकांस एक मोठ अग्निपरीक्षा करामस्क झाल॑.
अग्निपर्वत
nvolcano. ज्वालामुखी.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
भारताच एकच-एक अग्निपर्वत अंदमान-निकोबार द्वीप-समूहांत आहे.
अग्निप्रवेश
nwalking over burning embers of coal or wood fire under a vow. नवस करून कोळसाच विस्तू नाहीतर लांकडाच विस्तूच व॑र चालून जाणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तमिलनाडांतल॑ कित्येक देऊळांत अग्निप्रवेशाच नवस उदंड प्रसिद्ध आहे.
अग्निशमन
nputting out the fire. विस्तू विजिवणे. विस्तू शमन करणे. विस्तू शांत करणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
फार उंच असाच बांधणींला विस्तू पेटलतर ते शमन कराला पह्जते उपकरणीं अग्निशमनाच बंडीनीं अम्च गांवांत (गामांत) आहेका, हे अम्हाला संदेहच.
अग्निहोत्र
nname of a Hindu religious ritual dating to the Rigvedic times. ऋग्वेद कालांतून आचरण कराच एक हिंदू यज्ञाच नाव.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
ऋग्वेदाच अग्निहोत्र यज्ञालीन, अग्नीला फार महत्व द्याच फार्सी / पार्सी धर्म म्हणजे, ज़रथुष्ट्री धर्मालीन संबंध आहे म्हणून धर्म पंडितांच एक अभिप्राय आहे.
Note
- in this homa cow's milk, ghee, cooked rice etc are offered into fire every day at sunrise and sunset accompanied by the agnihotra slokas.
अग्निहोत्री
na priest who performs agnihothra. अग्निहोत्र यज्ञ कराच पुरोहित.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अग्निहोत्र कराच कित्येक ब्राह्मणकुलांच लोक त्यंच अडनाव अग्निहोत्री म्हणून ठींगतात.
अग्नी
nfire. विस्तू.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अग्नी कस करणे म्हणून आदि मनुषाला शिकाला झालते, मानव संस्काराच एक थोर विषय म्हणून शास्त्रज्ञ सांगतात.
अग्नी
nthe god of fire. अग्निदेव.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
ऋगवेदांत विष्णु, शिव ह्यांच पक्षा अग्नीला स्तुती कराच श्लोकांच संख्या जास्ती आहे.
अग्र
adjleading or top end or edge. apex. शेंडा. कोने भाग. शेवटीच भाग. अग्रभाग.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
महाराष्ट्रांत गोकुलाष्टमी दिवस ओठाकिवून / होठाकिवून ठिवलते एक मोठ काठीच अग्र भागांत दहींच मडके बांधून तला फुटिवाच खेळ उदंड आवेशांत खेळतील.
अग्र
adjforemost. best. स्रेष्ट.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पंचपांडवांत अर्जुनाला "अग्र" म्हणून सांगतात.
अग्रगण्य
adjconsidered as the best amongst all. प्रथम स्थानांत असाच. सग्ळ्याचीं पक्षा प्रधान.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
भूलोकांत एवढपर्यंतीन जन्म झालते सकल शास्त्रज्ञांतीन मध्ये अग्रगण्य ॲलबर्ट ऐनस्टैन म्हणूया.
अग्रभाग
adjleading or top end or edge. पुढेच भाग. वर्चभाग.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
सणाच दिवसी पान मांडून जेवण वाढताना पानाच अग्रभागांत मीठ वाढतील.
अग्रहार
nan enclave or a street in a village occupied by Brahmins. गांवांत ब्राह्मणलोक राहाच / राह्याच प्रत्येक ठिकाण. ब्राह्मणलोकांच वाडा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
बंगळूराच जवळ तमिलनाडाच धर्मपुरी जिल्लांत श्री राघवेंद्रस्वामींच ब्रिंदावन पाप्पारपट्टी अग्रहारांत ठिकाणी आहे.
अघाऊ
advin advance. beforehand. अगाऊ. पुढेच ; अघाऊ in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
बाह्येर गामाला / गांवाला कोठतरीन जायाच असलतर वापस येयाच टिकट अघाऊ घेऊन ठींगणे चोखट / चोखोट.
Note
- better अघाऊ.
अघाऊचकाळ
nearlier times. bygone times. अगाऊचकाळ. गेलते काळ.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अघाऊचकाळांत लांकडाच चूलींत संपाक करत होते अणी तजमळे संपाकाच रूच / स्वाद नीट होत॑.
Note
- better अघाऊचकाळ.
अघोर
adjdreadful. घोर. भयंकर. भें वाटाच.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
प्रेत पिशाचाच सिनिमा "ड्राकुळा" मला अघोर वाटल॑.
अच्च
nmould. अच्च.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
वराडांत नवरीला मूल-पाह्याच वेळी कट्टाच (लांकडाच) अच्चांत केलते विध-विधाच साखरीच-बावोली ठिवणे आहे.
Note
- from Tamil.
अच्युत
nLord Krishna. श्रिक्रिष्णा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अच्युत म्हणाच गोष्टाच अर्थ, कद्दीन दृढ स्थितींत असणार म्हणजे, कद्दीन नाश न होणार, अस॑.
अजय
adjunconquerable. one who cannot be defeated. हरिवाला होयनाते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मल्लयुद्धांत भीमसेन अजय होते.
अजित
adjunconquered. हरनाते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तज माय-बाप तला अजित म्हणून नाव बरोर ठिवले. कां म्हणजे, हातांत कोण्त काम काढलतरीन, कसलते कष्ट आलतरीन, ते अग्गीन समाळून / सांभाळून जिंताच सामर्थ्य तला आहे.
अजीर्ण
nindigestion. जीर्ण होयनास्क असणे. दहन होयनास्क असणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कित्येकदनांस कच्चा फणसाच भाजी खालतर अजीर्ण होईल.
Note
- (1) जीर्ण meaning digestion in DM is an earlier form of sm's जिरणे / पचणे. (2) Moleswoth's Marathi English Dictionary (1857) gives one of the meanings of जीर्ण as Digested Food. (3) though दहन means burning, it is also used in DM to mean digestion.
अजून
advyet. still. तरीन.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
चार घंटेच पुढे येतों म्हणून तो सांगीट्ल्होता. अत्ता साडे चार होत आहे. अजूनीं तो आला नाही. उगे थांबून प्रयोजन नाही, अम्ही निघुम्हणे.
अटकणे
vito get snagged. सांपडिंगणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
वाळिवाच दोरींतून वाळलते कापड काढताना कांबाच कोनेंत अटकून मझ एक अंगी फाटल॑.
अटकळणे
vito stumble. to trip over. पांय अडकून लंबडून / लवंडून पडणे ; अडकळणे / अडखळणे / अडखुळणे in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ बहिणी मैसूरांत बांधाच नव घर पाह्याला अम्ही गेल वार गेल्होतों. घराच आंत वेघताना उंबरांत बांधून ठिवलते अडव काठी पाह्यनास्क॑ मी अटकळून पडलों.
Note
- the different spellings in sm are as per J.T. Moleswoth's A Dictionary of Marathi English (1857).
अटणे
vito boil to a thick consistancy. अडणे. ताऊन उणे होणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दूधपेढा करताना दूधाच अटणे बरोर गवनांत ठीवींगाम॑ कां म्हणजे, जास्ती अटलतर दूधपेढा करपून जाईल.
अटोपणे
vito contain. पूर्णभागविणी असणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हिंदू धर्माच सगळ॑ मूलशास्त्र ग्रंथहीं ॐ म्हणाच ओंकार नादांत अटोपून आहे म्हणून विश्वास.
अटोपणे
vtto wind up. संपिवणे ; आटोपणे / आटपणे / आठोपणे in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मुंजीच छत्रांतून तेवढीन अटोपींगून / अटोपिवून उतरताना दुपारा चार घंटे झाल॑.
अटोपणे
vtto control. नियंत्रण करणे ; आटोपणे / आटपणे / आठोपणे in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
वराडाच वेच दहा लाखांत अटोपुया म्हणून मला वाटते.
अटोपणे
vtto put up with. सोसणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मी तीर्थ-प्रसाद घ्याला मठाला गेल्होतों. उदंड / उजंड वेळ झाल॑. मला भूक अटोपींगाला झाल नाही.
अटोपणे
vtto restrain. नियंत्रणांत ठिवणे ; आटोपणे / आटपणे / आठोपणें in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
उदंड आवेश येऊन तो वेडा कोणाल तरीन माराचपुढे कोण तरीन तला अटोपिवांत॑.
अट्टहास
nboisterous and uncontrolled behaviour. उदंड वरडत गलाटा करणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
वेगळ॑ लेंकरांच अट्टहास पाह्ताना अम्च लोंक फारच साधू म्हणून सांगूया.
अट्टहास
nboisterous and uncontrolled loud laughter. वेडपणाच हांस.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
जुने काळाच "मायाबज़ार" सिनिमांत घटोत्कच सांगाच एक गाणे अत्तापणीं अठींगटलतर मनाला कुशी / खुशी वाटते. ते गाणेंत॑ घटोत्कच कराच अट्टहास ऐकाला बेष / बेश अस्त.
अट्टा
ncard board. जाड कागद. रट्ट.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
नाजूक साधन अट्टाच डब्बांत जोडून ठिवताना मध्ये मध्ये फेविकॉल ठिवून जोडलतर चोखट / चोखोट.
Note
- अट्टा is from Tamil and रट्ट is from Kannada.
अठवण
nremembrance. recollection. सयेंत येणे ; आठवण in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
गेल वर्ष बालीला जाऊन आलास्की, तिकडे काय काय पाह्यलास म्हणून अठवण असलतर तजव॑र एक ल्हान पुस्तक लिव्हशीलका तू ?
अठवणे
vito come to mind. to remember. to recollect. सयेंत येणे ; आठवणे in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
गेल वर्ष बालीला जाऊन आलास्की, तिकडे काय काय पाह्यलास म्हणून तुझ मनांत अठवणे आलतर तजव॑र एक ल्हान पुस्तक लिव्हशीलका तू ?
अठींगणे
vtto recollect. सये करींगणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) अम्चेच चूकामळे हातांतून पैसे गेलते विषय अठींगून प्रयोजन नाही. (2) दोन दिवसाच पुढे तिज नव॑ बावोली हरपला पसून अत्ता पर्यंतीन / पतोरी ते ल्हान पोरी तेच अठींगून-अठींगून रडत आहे.
अठींगणे
vtto ruminate. योचना करणे. सुचींगणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दिसोडी अम्ही आध्यात्म विषयाच व॑र यू-ट्यूबांत येयाच प्रवचन ऐकणे आहे. दिवसांनंतर ऐकलते विषय अस्कीन स्मरण करून अठींगट्लतर अम्हाला मनाच एक विधाच चोखोट भावना येत॑.
अठींगणे
vtto suggest to oneself instantly. तक्षण मनांत सुचींगणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च लोंक अमेरिकांत वाचत आहे. अठींगलास्क समेच बांगळूराला पळून येयाला होईना.
अठ्रा
neighteen. सत्राच नंतरल संख्या ; अठरा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अठ्रा वर्षाच वये झालत्यांस अम्च देशांत मतदान कराला अर्हता आहे.
अड
ptcla particle used as prefix implying inferiority, subordinate status etc. उणे स्तितीच अस उद्देश करून सांगाच गोष्ट ; आड in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अडराण, अडवाट, अडझोंप, अडनीद असलते गोष्टांत अड म्हणजे अर्ध अथवा पूरा नसाच म्हणून अर्थ.
Note
- अडराण, a deserted place. अडवाट, narrow lane. अडझोंप, drowsiness. अड+नीद (निद्र,sleep) = अडनीद, drowsiness.
अडक
na type of cooking vessel. संपाकाच एक विधाच भांडी.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अडक भरून सांभार करून पणीन पुरे-पुरनास्क होईल म्हणून अम्च आजी अण्खीन एक अडकांत कढी करून ठिवले.
Note
- (1) with its diameter smaller than its height. (2) from Tamil.
अडकणे
vito snag. गुंतणे. गुंतांत सांपडींगणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पतंग उडिवत असताना दोरी एक नारळीच झाडांत अडकल॑ अणी ते सुटिवाच प्रयत्नांत दोरा तुटूनगेल॑.
अडकत्या
na scissors like instrument to slice betel nut. सुपारी कापाच कात्रास्कल एक उपकरण. अडकिता.अडिकित्या.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
जुने काळांत एक एक घरांतीन अडकत्या होत॑तरीन अत्ता ते पाह्णे फार अप्रूप झालाहे.
अडकरणे
vtto block. to obstruct. अडव करणे. मध्य येणे. अडव येणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कापड वाळिवाच कांब नंखर व॑र बांधल नाहीतर॑ लेंकरे पळा-पळी करताना कांब अडकरून खाले पडतील.
अडकिता
nbetelnut slicer. अडकत्या. अडिकित्या. सुपारी कापाच कात्रास्क असाच एक उपकरण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ लेंक तिज आजीच अडकिता कोठकी हरपूनटाकून काहीनच कळनात्यास्क उगे बसूनगेली.
अडकिवणे
vtto hang someting (in a hook etc). लोंबून घालणे. अडिकिवणे. लटकिवणे ; अडकवणे / अडकविणे / अडिकिवणे in sm means 'to hinder', 'to stop'.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
साळेंतून वापस घराला आलांपिरी / आलानंतर भिंतींत असाच खिळांत अडकिवलते पुस्तकाच पिशवी पुन्हा साळेला जायापर्यंतीं उघडाच दंडक नाही तला.
अडकिवणे
vtto get someone involved. to get someone entangled. एकाला अडिकिवणे ; अडकवणे / अडकविणे in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ दृष्टींत तू कराच काम चोखोट न्हो म्हणून वाटते. उगे मला त्यांत अडकिवून ठिव नोको.
अडखर्च
nincidental expenses. अकस्मात होयाच खर्च / वेच ; आडखर्च in sm.
अडखर्च
nminor expenses. ल्हान ल्हान खर्च / वेच ; आडखर्च in sm.
अडगल्ली
na by-lane. अडवाट ; आडगल्ली in sm.
अडगांव
na small far-off village. out of the way village. फार दूर असाच खेडे. जाऊन पावाला प्रयास असाच खेडेगांव ; आडगाव in sm.
अडचण
ndifficulty. constraint. उपद्रव. तंटा. कष्ट.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पैसाच काहीं अडचण असलतर संकोच भोगनास्क मला सांगा. मी तुम्हाला सहाय करतों.
अडचण
ncongestion. गुंपामळे होयाच तंटा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पटणाच जनसंख्या भयंकर होऊन वाढलाहे. कित्येक बीदी वाटी चालाल पणीन होयनाते एवढे अडचण झालाहे.
अडणे
vito boil to a thick consistancy. अटणे. तावून उणे होणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दूधपेढा करताना दूधाच अडणे बरोर गवनांत ठीवींगाम॑, कां म्हणजे, जास्ती अटलतर॑ दूधपेढा करपून जाईल.
अडनाव
nsurname. उपनाव. कुलनाव ; आडनाव in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मराठी लोकांमध्ये अडनाव प्रति व्यक्तीनीं ठींगतात॑. पण, अनेक तंजाऊर मराठी कुटुंबांत॑ उदंड वर्षापसून त्यंच अडनाव विसरलामुळे / सुटलतामुळे अडनावाच बद्दल / भरती नुस्त "राव" म्हणून ठिवींगतात॑.
अडनीद
nhalf sleep. half awake. drowsiness. अर्धझोंप॑. जागेझोंप.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दुपारच वेळ मी अडनीदांत असताना मला उठीवून सिनिमाला येतांतका म्हणून विचारलतर मी काय सांगू ?
अडभिंत
na parapet. उणे उंचाच भिंत ; आडभिंत in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तिरुपती देऊळांत देवाला दर्शन करालाम्हणून ओठाकाच / होठाकाच लोकांच पंक्ती नियंत्रण कराकरतां अडभिंत बांधून तज वर कांबाच जाळीच व्यवस्था केलाहेत.
अडमान
npledge. mortgage. pawn. वस्तूच जाम्य देऊन रीण काढणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अडमान ठिवलते घर सुटिवाला झाल नाही म्हणून घर लिव्हून द्याच अवस्था झाल त्यांस.
Note
- from Tamil.
अडराण
nbarren wilderness. विजन स्थळ. काहीं नाहीते ठिकाण. ओस बढिवलते ठिकाण ; आडरान in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्ही लेंकरे असताना एकदपा अनंतशयनांतून मद्रासाला जातम्हा कोठकी अडराणांत॑ बंडीच यंत्र नाश होऊन रात्री पूरा तिकडेच राह्मते पडल॑.
Note
- राण of DM is रान in sm, meaning forest.
अडव॑
advacross. cross. वलांडून असणे. एक बाजूकडून सोमोरल बाजूकडे. एक बाजूकडून सोमोरल पटीसाला असणे ; अडवा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) उंबरांत पांय अडव ठिवून बसताने म्हणून थोरळे सांगतील. (2) अडव असाच वाटेंतून गेलतर लोकुर जाऊया.
Note
- अडव॑ असाच वाट meaning diagonal road, not to be confused with अडवाट which means bylane or alley.
अडवतिडव
adjnot aligned properly. transverse. वंकडतिंकड ; आडवातिडवा / वेडावाकडा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ नातू तज स्नेहितांच बरोर खेळींगत असताना मी दोन दपा मागेसूं गेलों. तो समच "आजा, एक ठिकाणी बसा, उगच अडवतिडव येईनाका. अम्ही खेळत आहों" अस वरडला.
अडव पडणे
vtto interfere. अडवे येणे. मध्य पडणे ; अडवणे in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तो एक अवघड मनुष. अम्च सगळे कार्यालीं अडव पडलतरच तला मनस्समाधान होईल॑.
अडव येणे
vtto cross one's path. वाटेंत समोर एक पटीसून अण्की एक पटीसला वलांडून जाणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
घर सोडून बाह्येर जाताना काळ मांद्र अडव आलतर चोखट / चोखोट शकुन नहो म्हणतील.
अडव येणे
vtto interfere. अडव पडणे. मध्य पडणे ; अडवणे in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ भाऊ त्यंच प्ळोटांत॑ घर बांधाला आरंभ करतानाच कोणकी चार लोक अडव येऊन काम राह्त कराला सांगीटले. विचारताना, जमीन त्यंच म्हणून बडिवून सांगिटले.
अडवाट
nan ill prepared narrow by-lane. उणे रुंदाच कच्चा वाट ; आडवाट in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) अम्च घरांतून देऊळाला एक किलोमीटर आहे. अडवाटी गेलतर अर्ध किलोमीटर पणीन नाही तरीन अंधार झाला नंतर सर्पांच तंटामळे तस चालणे चोखट / चोखोट न्हो. (2) ते अडवाटेंत सर्पांच वाल्मीक (वारूल) भरून असाकरतां अम्ही तस जाणेच नाही.
Note
- वाल्मीक (वारूल) is ant hills. Adi Kavi Valmiki was called so because he was so deeply immersed in tapas that he was covered over by वाल्मीक. His real name was Ratnakar.
अडवेळ
nodd time. सौकर्य नाहीते वेळ ; आडवेळ in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अमच बाजू घरच मनुष केम्हा पाह्यलतरीन मी दुपारा झोंपी जायाच वेळच मझकड बोलाला येतील. अडवेळांत येईनाका म्हणून कित्ति दपा सांगिटल तरीन ऐकनात.
अडिकित्या
na hand held pincer like instrument for slicing betel nut. अडकत्या. अडकिता. सुपारि कापाच उपकरण. सुपारि चूर-चूर कराच एक ल्हान उपकरण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पान-सुपारीच पेटींतून त्यंच अडिकित्या काढताने म्हणून मझ अम्मा कित्ती सांगटलतरीन मझ॑ लोंक ऐकना म्हणतो. ते काढून कोठ तरीन लप्पून ठिवणेंत॑ तला संतोष वाटतेकी कायकी.
अडिकिवणे
vtto hang someting (in a hook etc). लोंबून घालणे. अडकिवणे. लटकिवणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पलंगाच चार पटीसीन भिंतींत खिळा बडिवून ठिवलतर केम्हा पह्जेतरीन डांचाच पर्दा अडिकिवाला सौकर्य असल॑.
अडिकिवणे
vtto fasten cross-wise (as an hindrance). अडव॑ बांधून ठिवणे. अडकिवणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
रात्रीच वेळ गाईच गोठांतून वांसरू बाह्येर पळून जाईनास्क असाला एक बांबू अडिकिवणे बर॑.
अडि-घालणे
vtscheming. plotting stealthily. रहस्यंत ओंगळ / वंगळ कामाच योजना तय्यार करणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ बरोर काम करणार एकला कंपनीच वाटेंतच अमेरिकाला जायाला अडिघालत आहे म्हणून मला आजच कळ्ल॑.
Note
- from Tamil usage.
अडिवणे
vi & vtto come in the way. to impede. अडव॑ येणे ; अडवणे in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
काहीं चूकाच काम कराला योचना केलतर अम्च मन्न अम्हाला अवश्य अडिवत अस्त / अडिवते.
अडीच
adjtwo and a half. दोन अणी अर्ध.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
एक किलो मीठ घेताना दुकानदाराला मी तीन रुपे देलों. तेनी मला पन्नास पैसे परतून / वापस देले. म्हण्जे, एक किलो मीठाच मोल अडीच रुपे जाल॑.
अणि
conjand. अण्खी. अण्की. अण्खीन ; आणि in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तपालांत आज मला दोन कागद अणि एक पार्सल मिळ्ल॑.
Note
- Molesworth's Marathi Dictionary (1857) mentions अणी and आणि, with the latter as the more commonly used word.
अणुशक्ती
natomic power. अणूंतूं काढाच शक्ती.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अण्खीन पुढे जातां-जातां देशाला अणुशक्तींतून "पवर" काढनास्क वेगळ॑ वाट असना.
अणू
natom. एक पदार्थाच एकदम ल्हानापक्षा ल्हान अंश. परमाणू.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
ब्रिटीष शास्त्रज्ञ जॉन डाल्टन, हेनीच पह्यिल॑ पह्यिल॑ अणू विषीन शास्त्रलोकाला कळिवलते.
अणे
nthe coin Anna. आणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
ते काळांत चार अणेला दोन इड्ली मिळत होत, पण अत्ता तेच इड्लीला पंध्रा रुपे झालाहे.
अण्कि
conjand. अणी. अण्कीं. अण्खीन.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दुकानांतून मला चार सामान घ्याच होते. तांदूळ, तुरीचदाळ, केरसोणि अण्कि तेल.
अण्कीन
conjadditionally. still more. अणी. अण्कीं. अण्कि.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) तुला पोट भरल॑ नाही तर अण्कीन थोड पोंगल खा. (2) अण्कीन फुंकलतर हे बलून फुटेल॑. (3) मला पाठ दुखताना अण्कीन एक ऊंशी डोस्केच खाले ठिवून/ठींगून निजलतर हायशी अस्ते.
अण्कीन
conjyet again. पुन्हा. अण्खीन.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तुम्च कष्ट पूरा मी ऐकलों. अण्कीन मला तेच सांगूंनाका.
अण्कीन
conjtill now. even now. अण्खीन. अत्ता पर्यंतीन. हे पर्यंतीन. हे पतोरी.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) मझ घरांतून मझ मित्र वापस (परतून) जाताना मोठ पौस (पाऊस) आरंभ झाल॑. ते करतां त्यांस मी मझ छत्री देलों. अण्कीन तेनि ते मला परतून आणून देल नाहीते. (2) पांच निमिषांत वापस येतों म्हणून गेलता अण्कीन आला नाही.
अण्णा
nelder brother. वडील भाऊ.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्ही भाऊ-भाऊंडेंत मीच धक्टा. मला तीन अण्णा आहेत.
अण्णा
nfather. बापा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च अण्णा ऑफीसांतून लोक्करच येतों म्हणटले, पण, एवढ॑ वेळ झालतरीन अण्खीन आल नाहीत॑.
Note
- this usage is more common in Kannada than in DM.
अण्थूण
nmattress. bed. गादी. निजाला उपयोग कराच कापूस भरलते लेप. अंथरूण. लेप. नाहिली ; अंथरूण / आंथरूण in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मला उदंड दिवसापसून मादसूळ होत. मझ जुने अण्थूण काढूनटाकून एक चांपाच व॑र निजाला आरंभ केला नंतर ते सूळ अपाप राहून गेल॑.
अति
adjextreme. उजंड. उदंड. दंड. फार.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
गुलाब एक अति मनोहर फूल आहे.
अति
prepover and above. over and beyond. अति.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
"अति" म्हणाच शब्दयोगी अव्यय "आग्रह" म्हणाच गोष्टाच पुढे जोडलतर "अत्याग्रह" म्हणाच गोष्ट होईल.
Note
- शब्दयोगी अव्यय means "preposition"
अतिथी
nguest. घराला आलते लोके.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च घरांत अतिथीला म्हणून एक प्रत्येक खोली केम्हाईन तयार होऊन अस्त.
अतिथी-सेवा
nhospitality. guest service. अतिथीला सेवा करणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अतिथी-सेवांत अम्च देश वेगळ॑ कोण्त देशाचीन मागे नाही.
अतिवृष्टी
ndeluge. मोठ पाऊस. सतत रिचिवाच पाऊस.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हे वर्ष डोंगूर प्रदेशांत झालते अतिवृष्टीमळे अम्च गांवांच भोंताले असाच जमीन पूरा पाणींत बुडून कापणीला तय्यार होतते पीक पूरा नष्ट झाल॑.
Note
- the word अतिवृष्टि is rarely used in its literal meaning in DM.
अतिवृष्टी
figexcess of a thing (beyond normal requirements). आवश्याच पक्षा उदंड जास्ती (होणे).
Used in a sentence · वाक्य प्रयोग
साधारण म्हणूनच मला दुसरेंला सहाय कराच बुद्ध नाहीतेमळे दुसरेपणीन मला सहाय कराला येत नाहीत. पण, कित्येकदा कोणतरीन मला सहाय कराला आरंभ करतानाच "तो एक शोंबेरी. एवढे केलतेच पुरे. अतिवृष्टी दाखिवाच आवश्य काहीं नाही" अस सांगतात.
अतिवृष्टी-अनावृष्टी
figeither too much or too little. उदंड जास्ती नाही, उदंड उणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) फार लोक त्यंच जीवन बरोर चालत अस्तान देवाच पटाला पणीन नमस्कार करनात. हेनीच कष्ट काळ आलतर, नित्य देऊळ-गोपूर म्हणून हिंडतील. असलते स्वभावाला अतिवृष्टी- अनावृष्टीच स्वभाव म्हणून सांगणे आहे. (2) चेन्नैंत एकदम पाऊस, नाहीतर एकदम ऊन. अतिवृष्टि अनावृष्टीच !
अतिशय
adjwondrous. अतिशय. विस्मय.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
राजा हरिशचंद्र सत्यनिष्टाच व॑र दाखिवलते अगाध साधना अतिशय होत॑ म्हणून सांगूया.
अतिशय
adjamazing. fantastic. अतिशय.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
क्रिकेटांत सचिन टेन्डूळकर मारलते रन्सीं तेनि मारलते सेंचुरीच संख्याईं पाह्यलतर त्यंच प्रदर्शन॑ एक अतिशय विषय म्हणून सांगणांत चूक काहीं नाही.
अत्तर
na type of perfume obtained from flowers. फूलांतून मिळाच एक चोखट / चोखोट वासाच द्रव्य.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अत्तर म्हणून अडनावाच एकले मझ बरोर ऑफीसांत काम करत होते. विचारताना कळ्ळ॑, त्यंच पूर्वज अत्तर उत्पादन करून विकत होतेत्यामळे त्यांस हे अडनाव आल म्हणून.
अत्तशाला
advfor the time being. अत्तसाला. हे वेळेला मात्र. सध्याला.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
आवश्य नाहीस्क पैसा वेच कर नोको. अत्तशाला पन्नास रुपे खर्च करलतर पुरे.
अत्तसाला
advfor the time being. अत्तशाला. हे वेळेला मात्र. सध्याला.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तुम्ही करत असाच काम अत्तसाला पुरे. राह्ते करा. नंतर पुन्हा आरंभ करूया.
अत्ता
advnow. हे वेळ॑ ; आता in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
"मागच पुढेच॑ (नंतरच) विषय चर्चा करून प्रयोजन नाही. अत्ता काय करूया, हे सांगा."
अत्ता-अग्गीन
advnowadays. अत्ता-अस्गीन. अत्ता-अत्ता. अत्ता हे काळांत. अत्ताच काळांत.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अता अग्गीन जुने काळास्क न्हो. चुकून पणीन कोणाच विषीनीं काहीं बोलाल नाही.
अत्ता-अत्ता
advrecently. just now. थोड दिवसाच / वेळाच पुढे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च गांवांत अत्ता-अत्ता नव होऊन आरंभ केलते बॅन्क कृषी अण्खी ल्हान उद्योगाला रीण देतात म्हणून कळ्ळे.
अत्ता-अत्ता
advnowadays. अत्ता अग्गीन. अलीकडे थोड दिवसापसून.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
काळ एवढे मोस झालाहे म्हण्जे, अत्ता-अत्ता कोणालीन विसंबाला नाही (पातेद्यालाच नाही).
अत्ताच
advnow itself. just now. अत्तास. समेच. सवेच. हे वेळांतेच.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
ते ल्हान पोरी हट्ट करून रडत बसल होती (बसल्होती). काय झाल म्हणून विचारताना "मला ते बावोली अत्ताच पह्जे" अस कुंथत कुंथत सांगट्ली.
अत्तास
advnow itself. हे वेळांतच. अत्ताच. समेच. सवेच.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
बेकरी दुकानांतून घेईंगून / घेऊन आणलते केक अत्तास खाऊन संपीव नोको, सायंकाळी अम्च घराला येणार लोकां करतां आणून ठिवलोहें ते.
अतृप्त
adjunsatisfied. तृप्त झाल नाहीते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
गांवाला नव आलते सरकारी अधिकारीच वागणे अम्हाला अवडल नाही. अम्ही फार अतृप्त आहों म्हणून त्यांस कळिवाला जातों.
अतृप्ति
ndissatisfaction. असंतोष. असमाधान.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तज वागणे थोडकपणीन बरोर नाही म्हणून मझ अतृप्ती स्पष्ट होऊन कळिवून पणीन तो सुधारला नाही.
अत्यंत
adjexceedingly. दंड. उदंड. उजंड. फार. अपार.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
एक नव अधिकारी गांवाला आलेकी म्हणून गांवाच लोक त्यंच बरोर बोलाल गेले. पण ते अधिकारीच वागणे बोलणे हे अग्गीन पाव्हून थोडक पणीन क्षमा नाहीते मनुषास्क वाटल॑. तेनी एक अत्यंत रागिष्ट मनुष आहेत म्हणून सांगींगून वापस येऊनगेले.
अत्या
nfather's elder or younger sister. बापाच वडील बहीण, अथवा बापाच धक्टी बहीण ; आत / आते / आत्या in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मला दोन अत्यालोक आहेत. त्यांत एकले मझ बापाच अक्का अणी दुसरे बापाच धक्टी / धकटी बहिणी.
अत्याग्रह
nexcessive desire. greed. अति आग्रह. केसाचतरीन व॑र दाखिवाच असाधारण इच्छा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मनाला नियंत्रण नाहीस्क एकाच व॑र अत्याग्रह दाखिवणे चोखट /चोखोट नहो.
अत्यावश्य
adjessential. अति अवश्य. मुख्य होऊन पह्जते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अमेरिकाला जाताना एरोप्ळेनांत एक-एकदनालीन एक सूटकेसांत बावीस किलोच सामान मात्र घेऊन जायाला सोडतात. ते करतां सूटकेसांत अत्यावश्याच सामान मात्र काढींगून जाम / जांव.
अत्युत्तम
adjperfect. ideal. फार योग्य असाच.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
न्याय कचेरीच न्यायाधीश (जड्ज) निशपक्षी असणे अत्युत्तम मात्र न्हो, अत्यावश्य पणीन आहे.
अथवा
conjor. अथवा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ घर चोखट मोलांत घ्याल एकले तय्यार होते. पण, विकामका अथवा विकणे नकोका म्हणून मी योचना करत आहें.
अदलाबदली
nmixed-up. swapped. एकालेक बदलणे. बदलाबदली.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) सरकारी हॉसपिटलांत उजलते लेंकरांना अदलाबदली कराच विषय पत्रांत फारदपा येऊनपणीन ते अक्रम अत्त पर्यंतीन उणे झाल नाही. (2) जुने काळांत परीट / धोबी लोके घरोघर येऊन अम्च कापड अग्गीन धुवून इस्त्री कराला काढींगून जायाच पद्धत होत॑. वेगळ वेगळ घराच कापड एकालेक अदलाबदली होताने म्हणून दर एक घराच कापडांतीन तेनी वेगळ वेगळ स्थिर छाप घालत होते.
अदृश्य
adjinvisible. दिसनास्क होणे. अप्रत्यक्ष होणे
Used in a sentence · वाक्य प्रयोग
साळेंत एक जादूगराच कार्यक्रम होत॑. त्यांत तेनी एक ल्हान पोरीला अम्च डोळे समोरच / सोमोरच अदृश्य करीवले.
अदृश्य
adjunseen. दिसनाते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
रात्रीच वेळ नुस्त डोळेला आकाशांत अंदाज़ान तीन हदार नक्षत्र दिसेल. तजपक्षा कोटानुकोटी नक्षत्र अम्च डोलेला पडनास्क अदृश्य होऊन हे ब्रह्मांडांत आहे.
अदृष्ट
nluck. भाग्य.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ मित्राला अदृष्ट बडिवले. भूटान लाट्टरींत त्यांस पन्नास लाख मिळ्ळ॑.
Note
- the usage अदृष्ट बडिवले is an example of transferring of Tamil usage to DM which is one of the key differentiators between DM and SM. A better uasage would be अदृष्ट लागल॑.
अदृष्ट
nfate. गेत. गत. कपाळच विधी.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कित्येकदन अदृष्ट म्हणतात, कित्येकदन कर्म म्हणतात, काय झाल तरीन तेनी तेनी काय करलेकी, तज परिणाम तेनीच अनुभव कराम / करांव.
अद्भुत
adjwondrous. आश्चर्याच.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हे भूमींत जीव अपाप उजलते / झालते एक अद्भुत विषयेच.
अद्भुत
adjwonderful. अद्भुत.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दीपावलीला अत्तलीकडे / अलीकडे विकाच नानाविध 'रोकेट' एकदम माघ असल तरीन आकाशांत अद्भुत रंगीं, डिसैनीं आणीवते. पाह्याला फार बेष अस्त.
अद्भुत
nwonder. अद्भुत.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
प्रकृतीच सृष्टिपक्षा मोठ अद्भुत वेगळ॑ कोण्तीनच नाही.
अद्वैत
nmonotheism. एकत्व. आदिशंकराचार्य प्रचार केलते सिद्धांत.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अद्वैत सिद्धांता प्रकार जीवात्म-परमात्म दोनीं एकच असलतरीन अम्हाला ते वेगळ॑-वेगळ॑ आहे अस वाटत॑ / दिसत॑ अणी हेज कारण ईश्वराच मायामळे म्हणून शंकराचार्य म्हणतात.
अधपतन
ndownfall. एक चोखट / चोखोट स्थितींतून नीच स्थितीला येणे. अधोगत.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
एक राज्यांत अन्याय, अक्रम असल॑ अधर्म वाढलतर तज अधपतन फार दूर नाही म्हणूया.
अधर
nlower lip. खालेच ओंठ.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पंध्रवां शतकांत श्री वल्लभाचार्या श्री कृष्णाला स्तुति करून लिव्हलते "अधरम मधुरम, वदनम मधुरम" म्हणाच मधुराष्टकमांत देवाच वर्णना अधरांतून आरंभ होत॑.
अधर
nlips. ओंठ.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च चार वयेच नातू लोटांत दूत पीताना पह्जे म्हणून अधरांत साये लावींगून "मीशा मीशा" म्हणून सांगून पडून-पडून हांसेल.
Note
- पडून-पडून हांसणे is a Tamil usage transferred to DM.
अधर्म
nunrighteousness. धर्म, न्याय, नीती असल॑ गुणांच विरुद्ध गुण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अधर्म अधीक होताना भगवान विष्णू अवतार काढून पुन्हा धर्म स्थापना करतील अस हिंदू धर्म विश्वास करत॑.
अधर्म
n(behaviour) contrary to religion or against accepted morality of society. धर्म अथवा समुदायाच विरुद्ध होयाच (कार्य / विषय).
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अत्ता समुदायांत होत असाच अन्याय, अक्रम हे सग्ळीन पाह्ताना अधर्म नियंत्रण कराला होयनाते एवढे वाढलाहे अस वाटत॑.
अधलामधे
adjto come in between. to interfere. to intrude. मध्य पडणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मीटिंग चालत असताना कित्येकदन अधलामधे बोलून चर्चांला गोंधळ करतात. असलते समस्या अधीकीन समूह-मंडळांत अस्त. ऑफीसांतल मीटिंगांत जास्ती अस्त नाही.
अधिकमास
nan additional thirteenth month introduced every thirty-three months as a correction in the Hindu lunar calendar. प्रति तेहतीस महिने चंद्रमान पंचांगांत जोडाच तेरावां महिना.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अधिकमासांत दान देलतर उदंड / उजंड पुण्य येईल म्हणून ते महिनेंत विध-विधाच साधनीं, तसच तेहतीस अपूपीन योग्य लोकांला दान देणे आहे.
अधिकवर्ष
nleap year. फेबृवरींत॑ 29 दिवस असाच वर्ष.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
भारताच प्रधान मंत्री म्हणून होतते श्री मोरारजी देसाई फेब्रुवरी 29 तारीखला उजले अणी त्यंच ऐंशीच उजलादिवस आघोष करत असताना "मझ जन्म अधिकवर्षांत झालत्यामळे आज मझ वीसवां उजलादिवस" अस॑ म्हणट्ले.
अधिकार
nauthority. निर्णय कराच अथवा आदेश द्याच शक्ति.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
जिल्लाधिकारीला / कळक्टराला जिल्लेच शासनाच संपूर्ण अधिकार आहे.
अधिकार
nright. हक्क.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
एक राज्याच विषयांत मध्य पडाला वेगळ॑ कोण्त राज्यालीन अधिकार नाही.
अधिकारी
nperson with authority. officer. अधिकार असाच मनुष.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
सरकाराच विद्याभ्यास विभागाच अधिकारी लोक अम्च गांवाला येवून उजंड / उदंड दिवस झाल तरीन, हे पर्यंतीन एक चोखट / चोखोट साळे पणीन उघडले नाहीत.
अधिपति
nmaster. lord. राजा. स्वामि.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
लंकापुरीच अधिपति असुर राजा रावणाला युद्धांत हरिवून श्रीराम सीतादेवीला मुक्त केले.
अधिरसम
na sweet preparation made from rice flour. तांदूळाच पीठांतून करलते एक गुळ्चीट पदार्थ. अनारस. अपूप.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अधिरसम खायाला मला फार अवडल तरीन तज व॑र शिंपडून असाच खसखसा खालतर मला आंगाला होईना.
Note
- from Tamil.
अधीक
adjmore. जास्ती. फार. उदंड. उजंड ; अधिक in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पोटसूळांतून कष्टी भोगत असताना आवश्यापक्षा अधीक जेवणे चोखट / चोखोट नहो.
अधीकउणे
adjmore or less. थोड जास्ती अथवा थोड उणे. जास्ती व्यत्यास नाहीते ; अधिकाउणा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हे वर्षाच पाऊस गेलवर्षाच बरोर तारतम्य करून पाह्ताना अधिकउणे तेवढेच होत॑ म्हणूया.
अधीकपक्ष
nmostly. पोणावांटा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मला पाह्याला आज तो येतो म्हणून सांगिटल होता. पण, अत्ता रात्री होत आहे. अधिकपक्षा येईना म्हणून वाटते.
अधीकपक्ष
nat the most. जास्ती-जास्ती.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तू तेच योचना करून अवस्था भोग नको. अधीकपक्षा तुझकडे असाच्यांत अर्ध तला देमते पडुया, एवढेच.
अधीन
adjsubjugated. दुसरेंच अधिकारांत असाच.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च राज्य ब्रिटीष यांच अधीनतांत सुमार दोनशें वर्ष होत॑.
अधैर्य
adjlack of courage. lack of confidence. diffident. स्वंत शक्तीच व॑र धैर्य अथवा विश्वास नसणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ काकाला मध्य-मध्य मेन्टल-डिप्रेशन येताना त्यंच तोंडांत अधैर्याच लक्षण स्पष्ट होऊन दिसेल.
अधोगति
ndownfall. दुर्गति. अधपतन.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
चरस पीणे, भांग खाणे, मद्य पीणे सिगरट फुंकणे हे स्वभाव तेवढीन अत्ता तो नव होवून / नवविणी आरंभ केलसाच पाव्हून तज कुटुंबाच अधोगती आरंभ झालाहे म्हणून सांगूया.
अधोलोक
nnether world. hell. पाताळ. नरक.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
रामायण युद्धाच समय एक रात्री श्रीरामालीन लक्ष्मणालीन अहिरावण विभीषणाच रूपांत येऊन अपहरण करून अधोलोकाला उचलिंगून गेला.
अध्यक्ष
nmain person. नेता. मुख्य मनुष.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
ब्रिटिषयांचकडून स्वतंत्र झालानंतर अत्ता पर्यंतीन पाकिस्थानाच अध्यक्ष पुन्हा-पुन्हा ते राज्याच सेनापति / सैन्याधीश लोकेच होत आहेत.
अध्यक्ष
npresiding officer. मंडळीच प्रधानी.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
एक ठिकाणी मला कार्यक्रमाच अध्यक्ष म्हणून बलावल्होते, पण बरोरल वेळाला मी तिकड जाऊन पावताना एक चिटपांखरू पणीन तिकड होत नाही.
अध्यात्म
nphilosophy relating to soul. आत्मांच विषयाच तत्वज्ञान.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
वय होतां-होतां अम्ही संसाराच विषय सोडून आध्यात्मिक विषयाच व॑र ध्यान देणे चोखट / चोखोट.
अध्यात्मज्ञान
nknowledge of the philosophy of the soul. अध्यात्म विषयाच ज्ञान.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
भारताच पूर्व राष्ट्रपती श्री सरवेपळ्ळि राधाकृष्णन एक थोर पंडित होते अणी अध्यात्मज्ञाना विषीन त्यनी लिवलते / लिव्हलते अनेक पुस्तक अत्ता पणीन अनेक महाविद्यालयांत प्रचारांत आहे.
अध्यापक
nteacher. पंतोजी. पाठ शिकिवून देणार.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हे वर्ष अम्च संस्थानांत दोन हदार / हज़ार अध्यापक नव होवून नियुक्त कराच उद्धेश आहे म्हणून विद्याभ्यास मंत्री गेल वार केलते प्रसंगांत सांगिट्ले.
अध्यापिका
nlady teacher. पाठ शिकिवून देणारी.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पोरींच साळेंत शिकिवाला अध्यापिका कोणीन नाही म्हणून तीन महिना पसून मोठ गलाटा होत असाच खाणी मध्य मध्य टी.वींत येत आहे.
अध्याय
nchapter. पुस्तकाच एक भाग. खंड.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ मित्र एक नव पुस्तक लिव्हत आहेत अस ऐकून एक वर्ष झाल॑. काल अकस्मात मी त्यांस दुकानबीदींत मिळून बोलताना कळ्ळ॑, एक अध्याय पणीन पूर्त झाल नाही म्हणून.
अनवंठी
nchin. the lowest part of the face. तोंडाच खालच भाग ; अनवठी in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
एक थोर ट्रेन अपघातांतून चुकले तरीन त्यंच अनवंठीला प्ळास्टिक सर्जरी करामते पडल॑.
Note
- from the Sanskrit root हनु, chin. Hanuman's lower jaw (हनु) was misshapen due to attack by Indira with his vjrayudha and hence he got the name हनुमान.
अनशन
nfasting. निराहार असणे. उपवास.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
आज एकादशी म्हणून पूरा दिवस अनशन करणार मी.
अनशी-पोट
nempty stomach. खाली पोट ; अनशें-पोट in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
चार घंटेच व॑र अनशीपोटांत असलतर पोटांत वायूच तंटा होऊया.
Note
- अनशवें-पोट / अनशिळं-पोट / अनशो-पोट / अनशोय-पोट / अनसोळें-पोट are listed by Molesworth as seldom used forms.
अनंत
adjendless. eternal. अंत नाहीते. केम्हाईं संपनाते. केम्हाईं वारनाते. निरंतर.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हे ब्रह्मांडाला परिधी नाही अणी ते अनंत आहे.
अनंतचतुर्दशी
nanantavratha. a pooja performed to propitiate Lord Vishnu as reclining on Ananta. अनंतव्रत. अनंतशयन-रूपी महाविष्णूला कराच एक पूजा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
भाद्रपद महिनाच शुक्लपक्ष चतुर्दशीला अनंतचतुर्दशी सण करतों.
अनंतव्रत
nananta chathurdashi. a pooja performed to propitiate Lord Vishnu as reclining on Ananta. अनंतचतुर्दशी. अनंतशयन-रूपी महाविष्णूला कराच एक पूजा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
वर्षावर्षी अम्ही अनंतव्रत सण अम्च घराच जवळ असाच श्री राघवेंद्रस्वामी मठांत जाऊन करतों.
अनंतशयन
nLord Vishnu. the Lord who reclines on Ananta. अनंतशयन-रूपी महाविष्णु.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
श्रीरंगमांतल॑ श्रीरंगनाथाच देऊळ अणी तिरुवनंतपुरमांतल॑ श्री पद्मनाभस्वामीच देऊळ, हे दोन दिव्य क्षेत्रांतीन महाविष्णु अनंतशयन रूपांत आहेत.
Note
- the name Thiruvananthapuram and the colloquial DM name अन्शन are derived from the अनंतशयन temple situated in that town. The name Thiruvananthapuram is a composite of Thiru (Tamil & Malayalam for श्री) + Anantha + Puram.
अनंतासन
na small pedestal kept inside a pooja mantap for placing God's idols. देवाच विग्रह ठिवाला मंटपाच / मंदासनाच आंत ठिवाच एक ल्हाण आसन.
अनाचार
ninappropriate behaviour. ओंगळ / वंगळ वागणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हे जवळ समुदायांत अनाचार अणी अक्रम उदंड जास्ती झालाहे.
अनाथ
adjorphaned. माय-बाप नाहीते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
त्यांस लेंकरे न्होत म्हणून एक अनाथ पोरीला दत्त घेटले.
अनाथ
adjabandoned. आश्रय नाहीते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
बीदींत असाच कुत्र, मांद्र असले अनाथ प्राणींला वाढिवाला एक नव संस्था आरंभ कराच योजना नगरपालिकाला आहे, अस मुख्य-मंत्री सांगिट्लते मी पत्रांत वाचलों.
अनाथालय
norphanage. अनाथ लेंकरे राहाच ठिकाण. अनाथाश्रम.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
एक एक पट्टणांतीन सरकार अनाथालय उघडलाहेत तरीन ते चालिवाच रीतींत अण्कीन भरून सुधार आणाम / आणांव.
अनाथाश्रम
norphanage. अनाथ लेंकरे राहाच ठिकाण. अनाथालय.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
बायका पोरींला म्हणून एक अनाथाश्रम अत्ता-अत्ता नव होऊन अम्च गामांत उघडले.
अनायास
adveffortless. उणे कष्टानिशी. उणे श्रमानिशी. कष्ट नाहीस्क. श्रम नाहीस्क.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
रात्रीच वेळ चोराला घूंसलते घर एक पहलवानाच म्हणून चोर्टाला कळ्ळ॑ नाही. पहलवान तला अनायास उचलून बाह्येर भिरकावले.
अनारस
na type of sweet preparation. अपूप. अधिरसम. तांदूळाच पीठांत केलते एक गुळ्चीट पदार्थ ; अनरसा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अधिकमास दान करताना तेतीस अनारस पणीन देणे आहे.
अनारुंद
adjwastrel. profligate. अवघड.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
ल्हान वयेंत बाप-मायांच उपदेश अवगणना करत होता. अता अनारुंद म्हणून हिंडत पडलाहे.
अनावश्य
adjunnecessary. आवश्य नाहीते ; अनावश्यक in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च वकीलाच मनांत तेनी थोर षाणे म्हणून होत॑. कोर्टांत मझ केस वाद / तर्क करताना अनावश्य बोलून केस हरलांपिरी त्यंच तोंड ल्हान झाल॑.
अनावृष्टि
nscanty or no rainfalls. पाऊस फार उणे पडणे अथवा थोडकपणीं पडनास्क असणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
गेल वर्ष पाऊसाळाच महिने पूरा संतत रिचिवाच पाऊस पडल॑, पण हे वर्ष पाऊस थोडकपणीन पडलं नाही. अनावृष्टि म्हणूनेच हेला सांगाम.
अनावृष्टि
figunexpected shortage or dearth (of anything). (कसाचतरीन) अकस्मात होयाच उणीवता अथवा कम्मीपण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ आजाला कळ्ळते एक थोर पल्लमदार मागे-पुढे प्हायनास्क दानधर्म करत होते म्हण. असलास्क-असून त्यंच उदार बुद्धीला काय झालकी कळना, इथपर एक दंबडी पणीन द्याला जात नाही म्हणून बसूनगेले म्हण. असलते अनावृष्टि प्हाऊन काय करांव म्हणून कोणालीन सुचल नाही.
अनिश्चय
nuncertainty. अनिश्चितता. (मनाला) व्यक्त होवून कळनाते अवस्था.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हे वर्षाच क्रिकट चॅम्प्यन्स ट्रोफी पाकिस्तानांत होईल म्हणून ऐ.सी.सी. निश्चय केलाहे. पण, ह्यांत भारत भाग घ्याच अनिश्चय म्हणूनेच सांगांव.
अनिश्चित
adjuncertain. अस्पष्ट.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तीन दिवसापसून मोठ पाऊस पडत होत-ते-करतां एरपोर्ट झांकून आहे. एरोप्ळेनांच येणे-जाणे अनिश्चित झालाहे.
अनीति
nagainst the laws. unlawful. न्यायाच विरुध. अन्याय.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
एवढे दिवस दुसरेंस एमारिवून जीवन चालिवलते मनुषाला अनीतीच वाटेंतून सुटिवून सुधाराला त्यंच घरच लोक केलते प्रयत्न व्यर्थ झाल नाही.
Note
- एमारिवणे is a loan-word from Tamil, meaning "cheating, fraud". The corresponding SM word is धोका.
अनुकंपा
ncompassion. दया. कारुण्य.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
ल्हान वयेंतूनच तिन॑ मूकप्राणींच व॑र अनुकंपा दाखिवत होती.
अनुकूल
adjagreeable. ओपाला योग्य असाच.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तुम्हाला अनुकूल असलतर मला सहाय कराला होईलका ?
अनुकूल
adjfavourable. suitable. योग्य.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हे वर्षाच पावसाळा / पाउसाळा कृषि उत्पादनाला अनुकूल असेल म्हण्तात.
अनुकूलता
nfavourable situation or condition. अनुकूल स्थिति.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ हे परिस्थितींत तुम्हाला पैसेच सहाय कराला होयना. पण, येयाच महीने मझ पैसेच अनुकूलता पाव्हून कायतरीन कराला पाह्तों.
अनुग्रह
nblessings. आशिर्वाद.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च लेंकरे चोखट /चोखोट स्थितींत अहेत म्हणजे, ते अम्च थोरळेंच अनुग्रह अणी आशीर्वादामळेच म्हणून सांगाम / सांगांव.
अनुताप
nrepentance. remorse. पश्चाताप. खेद व्यक्त करणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अपराध केला नंतर नुस्त अनुताप दाखिवाच पक्षा काहीं उपयोगाच काम करून दाखिवलतर प्रयोजन होईल.
अनुदिन
advevery day. दिवसोडि. प्रति दिवस. दिवसों-दिवस.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ ससरा अनुदिन देवपूजा करनास्क वेगळ एक कामीन करनात.
अनुभव
npractical experience. वेगळ वेगळ काम कराच रीत कळिंगणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) गेल वार अम्च ऑफीसांत कॉळेजांतून अत्ताच वाचणे संपिवून आलते एक नव मनुषाला नियुक्त केले. त्यांस ऑफीस कामाच अनुभव शुद्धांग नाही म्हणून कळ्ळकी नाही, कित्येक लोके त्यांस मष्किरी कराला आरंभ केले. (2) पाष्टे-पाष्टे मी केंस कापींगाला गेलों. पण, न्हावीला हजामताच कामांत थोडकपणीन अनुभव होत नाही अणी तो मझ केंस उंदीर चावून ठिवलत्यास्क इकडे-तिकडे कापून सोडला !
अनुभव
nto possess and gain experience of or custody of (a thing). (एक वस्तू अथवा साधन) स्वता उपयोग करून परिचय घेणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तिज दाल्ला एक नव कार घेट्ळा. एवढे दिवस स्कूटराच अनुभव तिला होत॑. अत्ता काराच अनुभव घेत आहे.
अनुभवी
adjexperienced. अनुभव असणार.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च देशाच प्रधान मंत्री अर्थशास्त्रांत थोर अनुभवी म्हणून सांगतात.
अनुमति
npermission. approval. संम्मत.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
लोकतंत्राच पद्धत प्रकार देशांत एक नव नियम आणिवाला विधानमंडलाच अनुमति आवश्य आहे.
अनुमान
nconjecture. ऊह.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
न्यायालयांत साक्षी देताना स्वंत अनुभवाच आधारांत बोलांव. ते सोडून, उगेच अनुमान करून बोलल॑ तर नंतर ते गोष्ट अम्हालाच उपद्रव देऊया.
अनुमान
ninference. मूल विषय बरोर कळिंगट्ला नंतर काढाच निर्णय.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
एक घर अथवा जमीन घेताना प्रमाण-पत्र पूरा बरोर वाचनास्क, विकणाराला न्यायानुसार विकाच अधिकार आहेका नाहीका म्हणून अनुमानाला येताने.
अनुयायी
na follower (of a leader). नेताला अनुसरण करून त्यंच मागे जाणार.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कित्येक राष्ट्रीय पक्षाच नेतालोकांच बरोर येणार अनुयायी लोक विपरीत तंटा कराच स्वभावाच असतात.
अनुराग
naffection. स्नेहभाव. प्रीति. प्यार.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तिला ते पोरावर उदंड प्रेम आहेतरीन दुसरेंच सोमोर तिज अनुराग दाखिवाला फार संकोच भोगते / दाखिवते.
अनुराग
nlove. प्रेम.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
नल अणी दमयंती ह्यंच मध्ये उगलते अन्योन्य अनुराग वाढिवणेंत एक हंसाच मुख्य भाग होत॑ म्हणून महाभारतांत आहे.
अनुराधा
nname of a star. एक नक्षत्राच नाव.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
नक्षत्र मंडलांत अनुराधा सत्रावां नक्षत्र आहे.
अनुवरणे
vitaken after. inheriting qualities of forefathers. chip off the old block. पूर्वजांच स्वभाव नंतर येयाच पिढीच कित्येकांस असणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
ते पोर तज आजाला अनुवरलाहे. तज पुस्तक, कापड, खेळाच सामान सर्वीन बरोरल॑ ठिकाणी असलनाहीतर / नसलतर तला नाकावर राग येईल.
अनुवाद
ntranslation. तर्जुमा. भाषांतर. एक भाषाच लेखाच अर्थ / सारांश अण्खीएक भाषांत लिव्हणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
महाकवी काळिदास यांस पुरातन भारताच सगळ्यांचीन पक्षा श्रेष्ठ कवी म्हणून सांगतात अणी त्यंच नाटक-लेख अग्गीन अनेक भाषांत अनुवाद पणीन झालाहे.
अनुष्ठान
nreligious ceremony or ritual. पूजा अथवा पूजा सेवाच पालन.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
स्मार्त संप्रदायाच बरोर पाह्ताना मध्व संप्रदायाच अनुष्ठान थोडक जास्ती आहे, अस दिस्त॑.
अनुसरण
nobedience. दुसरेंच इच्छा प्रकार वागणे / असणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
ल्हान वय पसूनच लेंकरांस अनुसरण शील शिकिवलतर थोरले होताना त्यंच चोखट / चोखोट वागणे पाव्हून लोक त्यांस प्रशंसा करतील.
अनुसार
prepin conformity with. in accordance with. (ते) प्रमाण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
ॲस्ट्रेलियाच बरोर झालते क्रिकेट परंपरांत भारताच खेळ फार उणाका होत॑. खेल आरंभ होयाच पुढे केलते योजनाच अनुसार खेळलासलतर हे अवमान झालासना.
अनेक
adjmore than one. एकापक्षा जास्ती.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अनेक वर्गाच लोक अणी अनेक रीतीच भाषा बोलणार, हे दोन विषयांत भारत-देश भूलोकांत प्रथम स्थानांत आहे म्हणूया.
अनेक
adjmany. भरून. उदंड. उजंड. दंड.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कित्येक दपा कोणीं परदेशाला जाताना अनेक लोक तला एयरपोर्टांत येऊन पाठिवून द्याच पाव्हूया.
अनेक
adjinnumerable. countless. असंख्य.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
शंभर दीडशें वर्षाच पुढे पर्यंतीन अम्च देशाच राणांत अनेक वाघ होत॑, म्हणजे मोजाला होईनातेवढे संख्यांत होत॑. पण, नियंत्रण नाहीस्क झालते शिकारामळे अत्ता वाघांच संख्या फार उणे झालाहे.
अन्थूण
nmattress. अण्थूण. अंथरूण. लेप. नाहली. निजाला उपयोग कराच कापूस अथवा स्पंज भरलते लेप.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) जुने कालांत लोक जास्ती-जास्ती कापूसाच अन्थूण घेत होते. अत्ता ते सोडूनटाकून स्पंज अणी कोयर (नारळीच तंतु) भरलते मॅट्रेस घ्याला आरंभ केलाहते. (2) मला उदंड दिवसापसून माद सूळ होत॑. मझ जुने अन्थूण काढूनटाकून एक चांपाच वर निजाला आरंभ करला नंतर ते सूळ अपाप राहून गेल॑ / सुटल॑.
अन्न
nfood. जेवाच पदार्थ.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
भीकारी लोकांच लेंकरे भूकांन बीदींत रडत असताना पैसावंत लोकांच घरच॑ वराडाच वेळी अन्न व्यर्थ करणे प्हाऊन सोसाला होत नाही मला. Note The word अन्न, to mean food, is rarely used in DM. In Kannada अन्न means rice.
अन्न
ncooked rice. भात. शिजिवलते तांदूळ.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
नव तांदूळ, म्हणजे एक दोन महिनेच पुढे कापणी झालते पीक शिजिवताना अन्न मुद्दा धरून बसणे सहजेच. Note in Sanskrit अन्न means "food" and "cooked rice". In Kannada अन्न means "cooked rice". The word अन्न is rarely used in DM to mean "cooked rice", भात being the word normally used.
अन्नदाता
nbenefactor. दान-धर्म करणार.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तमिलनाडाच जुने मुख्य-मंत्री एम.जी. रामचंद्रन सिनिमांत अभिनय करत होतते वेळांतेच म्हण्जे, मुख्य-मंत्री होयाच पुढेच, दरिद्र लोकांला फार सहाय करत होते. हेला एक कारण होते म्हणून विरोध पक्षाच लोक सांगतात. तेनी एक अन्नदाता आहेत म्हणून लोकांच मनाचांत राह्यलतर जनतंत्रांत त्यांस पुढे उपयोग होईल, हे करतां तेनी अस केले म्हणून सांगतात.
अन्नदान
nfood aid. food distribution for the needy. आवश्य अहेत लोकांला जेवाच पदार्थ वितरण करणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
यंदा उत्तर प्रदेश अणी बीहारांत पाऊसाळाच अतिवृष्टी होवून भयंकर प्रळय झाल॑. दोन संस्थानातीन अनेक ठिकाण पाणींत बुडून खेडेगांवाच लोके तिकडे-तिकडे सांपडींगून दोन-तीन दिवस खायाला काहीं नाहीस्क अवस्था भोगले. केंद्र सरकाराला सेनाच हेलिकोप्टर उपयोग करून त्यांस अन्नदान करामते पडल॑.
अन्नप्राशन
nceremony marking feeding of rice to an infant for the first time. लेंकरांला पह्यिलंदा भात द्याच सण. अन्नमुहूर्त. उष्टावण. उष्टवण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्ही मुंबईंत असताना अम्च लेंकीच अन्नप्राशन जोगेश्वरींत असाच श्री राघवेन्द्रस्वामी मठांत करिवलों.
अन्नमुहूर्त
nceremony marking feeding of rice to an infant for the first time. लेंकरांला पह्यिलंदा भात द्याच सण. अन्नप्राशन. उष्टावण. उष्टवण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
साधारण होऊन अन्नमुहूर्त सण लेंकरे सहा अथवा सात महिने अस्ताना करणे आहे.
अन्य
adjother. वेगळ. दुसर॑.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अन्य देशाच लोक अम्च देशांत घूंसून / घुसून समुदायांत अक्रम अणी अस्वस्थता हे सग्ळ॑ पसराला सोडनास्क पाह्यींगणे सरकाराच जवाबदारी आहे.
अन्याय
ninjustice. अनीती.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) समुदायांत अन्याय काहीं होताने म्हणजे एक-एकलेंचीन वागणे न्यायाप्रकार असूनेच सराम. (2) ऑफीसांत पैसाच गोळमाळ केलता एकला, पण तला सोडूनटाकून दुसरे कोणालकी दंड देले. पाप, अन्याय झाल॑.
अन्याय
nan illegal act. न्यायनीतीच विरुद्ध काम. अपराध.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पेट्रोळांत केरोसीन मिळिवून विकाच अन्याय करणारांला एक दिवस पोलीस धरतील.
अन्याय
nan offence. a crime. impropriety. अपराध.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
बाजू घरच दंपतींच मध्ये थोर भांडा-भांडी होऊन तिजवर लटक॑ अपराध सांगून घरांतून बाहेर लोटलते एक थोर अन्याय झाल॑ म्हणून लोके सांगतात.
अन्याय
figdisproportionate to reason or law (in a negative sense). साधारणापक्षा फार जास्ती.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ नातू अन्याय तंटा करतो म्हणून मझ लोंक तला सदाहीं शिवा देत अस्तो.
अन्योन्य
adjreciprocal. mutual. एकालेक. परस्पर.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दीपावळीच दिवसी आंग पूरा तेल माखून / माखींगून आंघोळी कराच पुढे अम्हाला सर्वानीं मिळून आरती काढताना अम्मा सांगतील "तुम्ही भाऊ-भाऊंडे मोठ झाल नंतरपणीं केम्हाईं अन्योन्य मिळून प्रेम अणी सहाय करत असांव / असाम॑".
अन्वेषण
ninquiry. investigation. विचारणा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च गांवाच / गामाच तहशीलदार एक वर्ष सस्पंन्षनांत होते. नंतर झालते अन्वेषणांत त्यंचवर केलते अपराध कोण्तीन खर॑ नहो म्हणून झाल॑.
अन्वेषण
nsearch. हुडुकणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
जैलांतून चुकून पळून गेलते कैदीला धराला सहा महीने पसून अन्वेषण होत आहेतरीन, हे पर्यंतीन पोलीसाला तज विषीन काहीनेच विवर मिळ्ळं नाही.
अपकार
na misdeed. उपकाराच विरुद्ध. दुस्सहाय.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तुझ चुलतभाऊ एक अवघड मनुष म्हणून कळ्ळतेचकी. उपकार करतों म्हणून सांगून केलते पूराहीं अपकारेच. मग कां तला घराच आंत सोडलीस ?
अपकीर्ती
ninfamy. ill repute. ओंगळ / वंगळ नाव.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च मानमर्यादा राखिवाम / दाखिवांव म्हण्जे अम्च नावाला एक अपकीर्ति पणीन येईनास्क पाह्यींगाम.
अपघात
naccident. अकस्मात झालते दुर्घटना. आपत. आफत.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
बीदींत एक अपघात झालतर, ते मनुषाच जीव रक्षा करापक्षा लोके तिकड नुस्त गुंपगुंडाळत तमाषा पाह्त असतील.
अपभ्रष्ट
adjthat which has become corrupted. degenerated. अपभ्रंश झालते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तंजावूर-मराठी पुने-मराठीच एक अपभ्रष्ट रूप म्हणाच चूक आहे, कां म्हणजे, सोळावां सत्रावां शतकाच नंतर तंजावूर-मराठी एक वेगळ गतींत पुढे गेल॑ अणी तमिल भाषाच संपर्कामळे तला आजच रूप आल॑. म्हण्जे, सत्रवां शतकाच नंतर हे दोन भाषाईं वेगळ वेगळ गतींत पुढे गेल॑ विना, एक अण्किएकाच अपभ्रष्ट रूप आहे म्झणून सांगणे चूक होईल.
अपभ्रंश
ncorrupted word or language. मूल रूपांतून वेगळ॑ होऊन विकार झालते शब्द अथवा भाषा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तंजाऊर मराठी बोलणर लोके त्यंच भाषा लिव्हाच दंडक सोडूनटाकले अणी पुढच॑ एक एक पिढीलीन ते भाषाच लिपी कळाला अवसर मिळ्ळ॑ नाहीत्यामळे गोष्टाच उचारण अपभ्रंश होत गेल॑.
अपमान
ninsult. disrespect. अवमान.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च आफ़ीसाच मॅनेजराला आवश्य नाहीस्क दुसरेंना अपमान कराच स्वभाव आहे.
अपमान
nshame. अवमान.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तिज वर आलते अपमान सोसाला होईनास्क तिन आत्महत्या कराला प्रयत्न करली.
अपमान
ndisgrace. humiliation. अवमान.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दुसरेंना उगे उगे अपमान करून बोलाच कोणालीन अवडना.
अपराध
noffence. crime. गुन्हा. अन्याय. दोष.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पांडवांच विरुद्ध करलते अन्याय सग्ळीन अपराध म्हणून ओपींगाला दुर्योधन तय्यार न्होता.
अपराधी
adjguilty. चूक करलते मनुष.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
शिक्षा अनुभव कराच अपराधी प्रायश्चित्त करलतर पुढे समुदायाला एक उपयोगी होयाला साध्य आहे.
अपरूप
adjrare. uncommon. अप्रूप. अपूर्व. असाधारण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च घराला अपरूप आले म्हणून त्यांस उदंड उपचार करलों.
अपलपोटी
adjselfish. स्वार्थ. स्वंत काम मात्र पाह्यींगणार.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तो एक अपलपोटी मनुष. तज काम कायतरीन असलतर मात्र लाडी-गोडी बोलाल येईल.
अपवाद
nslander. लटक आरोप.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
स्यमंतकमणी चोरलते अपवादांतून चुकाला श्रीक्रिष्णाला कठिन श्रम करांमते पडले.
अपशकुन
nill-omen. ओंगळ / वगळ शकुन.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
एक चोखट / चोखोट कामाला तीघदन मिळून घरांतून निघाच अपशकुन म्हणतात.
अपसव्य
nwearing jaanav by looping one end over the right shoulder and letting it trail towards the left hip. उजव॑ खांदाच व॑रून आरंभ करून डावीच कडेला / कटीला येयास्क जानव धारण करणे. प्राचीनाविधी.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
साधारण होऊन जानव सव्य विधांत धारण करतोंतरीन श्राद्धाच वेळी पित्रूंला संबंध झालते मंत्र सांगताना अपसव्य करणे आहे.
Note
- अप implies contrariety, in this case of सव्य.
अपस्वर
nfalse
Note
- चुकलते स्वर. uis संगीत कच्चेरी आरंभ कराच पुढे अपस्वर होयनास्क असाला सगळ॑ वाद्यहीं वाजीवून पाह्याच दंडक आहे.
अपस्वर
figunpleasant utterance. अवघड गोष्ट.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कोणीं एक चोखोट / चोखट विषय बोलताना मध्य पडून अपस्वरास्क बोलाच वंगळ / ओंगळ स्वभाव तला आहे.
अपहरण
nabduction. बळप्रयोग करून घेवून जाणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
सीतादेवीला अपहरण कराला येताना रावण एक सन्यासीच वेष घालींगून आला.
अपहरण
nstealing. चोरणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
चोर्टे लोकांस॑ एवढे धैर्य आलाहे म्हण्जे, पुढे मादिरी रात्रीचवेळ मात्र नहो, अत्ता पाष्टेच वेळपणीं अपहरण कराला आरंभ केलाहेत
Note
- मादिरी meaning सारख॑ is from Tamil / Malayalam.
अपहास
nridicule. मष्करी. मस्करी. परिहास. उपहास.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दुसरेंस पाह्यिलतर अपहास करून बोलाच वंगळ / ओंगळ दंडक तला आहे.
अपाप
advby oneself. by itself. स्वता ; आपोआप in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) घरांत वाढिवलते मांद्राला /मांदराला दूर नव ठिकाणि सोडलतरीं ते अपाप परतून वागलते घराला येईल. (2) मझ कंप्यूटर दोन दिवसापसून हाळ झाल्होत. आज ते अपाप बर॑ झाल॑.
अपाप
advspontaneously. स्वता ; आपोआप in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) मी काल संध्याकाळी रेडियोच गाणे ऐकत असताना ते अपाप राहून गेल॑. (2) उन्हाळाच दिवस कित्येकदा राणांत अपाप विस्तू पेटाच संभव आहे.
अपाय
ndanger. हानी.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तिरुपती डोंगूरांतून परतून येताना अम्च बस्साच ब्रेक नासून गेल॑. बस हांकणाराच षाणपणामळे / सामर्थ्यामळे मोठ अपाय काहीं होयनास्क चुकींगटलों.
अपाय
ndamage. loss. नष्ट.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
चंद्राला पाठिवलते "चंद्रयान-2" शून्याकाश वाहन चंद्रांत उतरताना कायीन अपाय होईना म्हणून प्रार्थना कारूम्हणे.
अपार
adjimmeasurable. भरून. उदंड. उजंड.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
एक-एक आजा-आजीलीं त्यंच नातूंडे अपार बुद्धिवंत आहेत, अस वाटाच सहजच.
अपूप
na type of sweet preparation. अनारस. अधिरसम. तांदूळाच पीठांतून केलते एक गुळ्चीट पदार्थ.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अधिकमास दानाला तेतीस अपूप पणीन देणे आहे.
अपूर्ण
adjincomplete. पूरा झाल नाहीते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
भारताच जनतंत्र कक्षींच मध्य महिलांस विधान सभांत कित्ति वांटा स्थिर होऊन द्याच, हे चर्चा अत्ता पतोरी / पर्यंतीन अपूर्ण स्थितींतच आहे.
अपूर्व
adjunprecedented. आत्ता पर्यंतीन झाल नाहीते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मध्य भारताच रेवा राज्याच राणांत अपूर्व होऊन एक पंढ्र रंगाच वाघाला पहिलंदा दिसल॑.
अपूर्व
adjrare. uncommon. अपरूप. अप्रूप. असाधारण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अत्ता अनेक देशाच मृगशालेंत पंढ्र रंगाच वाग आहे. ते एक अपूर्व विषय नहो.
अपेत्र
adjunworthy (to be a recipient). (देणगीला) अयोग्य असणार. लायक नाहीते. नलायक ; अपात्र in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दंपती लोकांस देणगी देताना बरोर पाव्हूनच देम॑, कां म्हणजे तेनी अपेत्र असलतर अम्हाला पुण्यफल मिळना.
अपेक्षा
nan earnest request, desire or expectation. गाढ इच्छा, विनंती अथवा आग्रह.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
न्यायकचेरींत हे केस विचारणाला आलतम्हा कैदीच वकील कैदीला जाम्यांत सुटिवून ध्याला न्यायाधीशाकडे / जड्जाकडे अपेक्षा केले / करले.
अपेक्षापत्र
napplication form. अपेक्षा समर्पण पत्र.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
सरकाराच नव सूचना प्रकार कृषि विभागाच टैपिस्ट-स्टेनोग्राफराच उद्योगाला अपेक्षापत्र पोंचिवाच शेवटीच दिवस अण्कीन तीस दिवस पुढे केलाहेत.
अप्पच्चि
adjsqueezed flat. चपटा. सपाट. चेंपून / चेंचून चपटा करणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कित्येक लेंकरांस नव टूत-पेस्ट हाती मिळूनगेलतर समेच / सवेच ते अप्पचि कराला एक विधाच संतोष येत॑.
Note
- (1) from colloquial Tamil. (2) चपटा of Tamil is सपाट of sm / DM.
अप्पि-पायसम
nkheer (sweet porridge) made of small pieces of rava papad. अप्पीच खीर. पापडाच खीर.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कोण्त थोर सण आलतरीन अम्च अम्मा अप्पि-पायसम अणी आंबोडे हे दोनीं करूनेच सरतील.
Note
- some use maida for making the papad, while the authentic recipe uses only rava. Some mix rava and maida in suitable proportion to get a good texture of the papad.
अप्पिंगणे
vtto daub or smear nore that what is necessary. आवश्या पक्षा जास्ती लाविंगणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ बहिणी चुम्मण पोरिविणी असताना अपाप शृंगार करींगते म्हणून तोंड पूरा पौडर अप्पिंगून येईल.
अप्पीच खीर
nkheer (sweet porridge) made of small pieces of rava papad. अप्पि-पायसम. पापडाच खीर.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अप्पीच खीर अणी पापडाच खीर हे दोनांमध्ये काहीं व्यत्यास नाही. दोनीं एकच.
Note
- some use maida for making the papad, while the authentic recipe uses only rava.
अप्पून-तप्पून
advby fluke. not by design. by chance. चुकून-माकून.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मला कळून तो वाचणेंत शाहणा / षाणा काहीं नहो. कसकी अप्पून-तप्पून परीक्षा जिंतला.
Note
- Tamil origin (अप्पि-तप्पि).
अप्रत्यक्ष
adjvanish. invisible. दिसनास्क होणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
साळेंत एक जादूगाराच कार्यक्रम दोन दिवसाच पुढे झाल॑. त्यांत तेनी एक ल्हान पोरीला अम्च डोळे्च समोरच / सोमोरच अप्रत्यक्ष करले.
अप्रूप
adjrare. uncommon. अपरूप. अपूर्व. असाधारण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) जुने काळाच अप्रूप झालते नाणे अणी तपाल-स्टॅम्प हे काळांत मिळणे फार कष्ट झालाहे. (2) थोर मनुष झालाहें म्हणून तेनी स्वता म्हणींगटलाहेतकी कायकी, अम्च घराला येणे फार अप्रूप झालाहे.
Note
- 1. better अपरूप. 2. DMs prefer to use the word चिल्लर / चिल्लरे for coins, rather than नाणे.
अप्सरा
na class of beautiful celestial dancers of Hindu religious texts. हिंदु पुराण / धर्मकथा प्रकार देवलोकाच सुंदर नर्तकी स्त्रीजन.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
महर्षि विश्वामित्र अणी स्वर्गलोकाच अप्सरा मेनकाच लेंक होऊन शकुंतला उजली.
Note
- the etymology being अप् (water)+सरा (movement - in this context gamboling or frolicking). The meaning evolved over centuries to the present day description as celestial dancers.
अबद्ध
nblunder. चूक.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
ब्रिटिष ईस्ट-इंडिया कंपनीला मुगळ साम्राट जहांगीर भारतांत व्यापर कराला अनुमती देलते एक थोर अबद्ध झाले म्हणून नंतरल॑ इतिहासांतून कळते.
अभय
nprotection. शरण. रक्षा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
परदेशांच अभय अणी अधीनांत होतते अनेक राज्य दुसर लोकयुद्धाच नंतर स्वतंत्र झाले.
अभय
na place which offers protection. sanctuary. अभयाच ठिकाण आश्रयस्थल. आश्रयस्थान.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(2) अनाथ लेंकरांला पालन कराला म्हणून अम्च गावांत एक नव अभय-आश्रम (अभयाश्रम) उघडाला सरकार निश्चय केलाहे. (2) भारतांत वाघांच संख्या फार उणे होत गेलत्यामळे पूर्व प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधि तज सुरक्षा करतां "प्रोजक्ट टैगर" आरंभ करले. हे प्रकल्पाच खाले भारतांत वाघांच अभय ठिकाणाच संख्या अत्ता जवळ जवळ साठ पर्यंतीन झालाहे.
अभंग
nMarathi devotional songs of a particular genre sung mainly in praise of Lord Vitthala of Pandharpur. एक रीतीच मराठी भजन / भक्ति गाणे मुख्य होऊन पांडुरंग विट्ठलावर सांगाच भक्ति गाणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पांडुरंग विठ्ठलाला स्तुती करून सांगट्लते अभंग फार लोकप्रीय होयाला एक मुख्य कारण तजांतल॑ भक्तिरसामळे आहे.
अभिनय
nacting in a play, cinema etc. नाटक अथवा सिनिमांत एक पात्राच भाग करणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे, इकडून अभिनय कला शिकींगून आलते अनेक जन / दन नंतर सिनिमा रंगांत कीर्ति संपादलाहेत.
अभिनय
nname of a concept in classical Indian dance. नाट्यशास्त्रांत एक कल्पनाच नाव.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कथकळि नृत्य-नाटकांत अभिनय रस अणी मुद्राच उपयोग हे दोनालीन सम / तुल्य प्रामाण्य देतात.
अभिनंदन
ncongratulations. अभिवादन.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
सचिन टेंडूळकर सौत आफ़्रिकाच विरुद्ध 20-20 क्रिकेट खेळांत दोनशे रण मारताना राष्ट्रपति अणी प्रधानमंत्री हेनी दोघीन अभिनंदन करले.
अभिप्राय
nopinion. विचार.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
एक विषयाचव॑र चर्चा होत असताना अम्ही अम्च स्वंत अभिप्राय व्यक्त करलांपिरी / केलानंतर तज व॑र दृढ असणेच चोखोट.
अभिमान
npride. योग्य गर्व.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तंजाऊर मराठी भाषा सुधाराम म्हण्जे हे भाषा बोलणार लोक त्यंच मातृभाषाच व॑र अभिमान दाखिवाला पह्जे.
अभिवादन
nobeisance. reverential salutation. homage. आदराच वंदना.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
विज्ञानांत अम्च देशाला मोठ नाव आणिवाच उद्देशांत युवजनांला प्रोत्साहन करणे अणी सरळ स्वभावाच वागणे, हे दोनांमळे डा. अब्दुळ कलाम ह्यांस पूरा देशाच अभिवादन मिळ्ळ॑ म्हणून सांगणेंत / सांगण्यांत चूक असना.
अभिवादन
ngreetings. शुभेच्छा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दोन दिवसाच पुढे मझ उजलादिवस होत॑. अम्च वाट्साप ग्रूपांत भरून अभिवादन येईल म्हणून पाह्त होतों. पण, नुस्त तीघदनांकडून मात्र आल॑ !
अभिवृद्धि
nimprovement. चोखोट स्थितीला वाढून येणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
भारत स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष होताहे तरीन, अनेक विषयांत अण्कीन अभिवृद्धि होयाच आहे.
अभिषेक
npouring consecrated offerings on God's idol. देवाच विग्रहाच व॑रून पंचामृत, सोने, मेध, दूध, दहीं असल॑ पदार्थ घालून पूजा करणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च घरांत कोणाच उजलादिवस आलतरीन ते दिवसी श्रीराघवेंद्रस्वामीला पंचामृत अभिषेक करणे आहे.
अभ्यास
npractice. एक काम / विषय पुन्हा-पुन्हा करून तज विषीन बेष कळींगणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कोण्त विषय झालतरीन फार अभ्यास करनातर ते पूरा स्वाधीन कराला होईना.
अमक्कळ
nchaos. disorder. गोंधळ.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च वठारांत / इलाखेंत राहणार लोके आजू-बाजूच कित्येक विषय कस सांभाळाम /समाळाम, हे निश्चय कराला एक सभा बलावून चर्चा करले. मझ बाजू घर्च मनुषाच मूर्खपणामळे सभांत अमक्कळ होऊन एक निर्णयपणीन काढाला झालनाही.
Note
- from Tamil.
अमच॑
pronour. ours. अम्च. अम्हाला संबंध झालते ; आमचा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
एवढे वर्ष अम्ही भाडेच घरांत राह्त होतों, अत्ता पुढच महिनापसून अमच॑ स्वंत घराला गृहप्रवेश करींगून सरकाला जातों.
Note
- DMs use the spelling अम्च most often.
अमर
adjimmortal. चिरंजीवी.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हे भूलोकांत जन्म काढलतर एक दिवस कंडिप मरूनेच सरामं. कोणालीन अमर राह्याला / असाला होईना.
अमावस्या
nnew moon day. कृष्णपक्षाच शेवटल॑ दिवस.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अमावस्या दिवसी संपाकांत केळे वापरलतर चोखट / चोखोट म्हणून सांगणे आहे.
अमुक
adja specified and/or intended one. सूचना केलते एक ; अमका / अमुक in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मला तुम्ही दहा पंध्रा काम एकच वेळ सांगिट्लतर मनांत गोंधळ होईल. मझकडून काम नीट करिवाच असलतर अमुक काम करा अस सांगा.
अमुकअमुक
adjcertain specified (things). प्रत्येक-प्रत्येक काढून सांगट्लते ; अमकातमका / अमुकतमुक in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
उद्या घरांत बनशंकरीच पूजा आहे. आज पाष्टे आचारे घराला येऊन पूजाला पह्जते अमुकअमुक सामग्रींच चिट्टि एक कागदांत लिव्हून देवून, ते सगळीन आज संध्याकाळीच / सायनकाळीच पुढे तय्यार करून ठिवांत म्हणून सांगूनटाकून गेले.
अमृत
nnectar, a celestial drink imbibing which one attains immortality. अमर स्थिती द्याच देवलोकाच श्रेष्ट पानीय.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
निरंतर वांचाला अम्ही कोणीं अमृत पीवूनटाकून आल नाही. तजमळे हे भूलोकांत अम्च असणे-वागणे सर्वीन बरोर असाम.
Note
- from अ + मृत, meaning मृत्यु नसाच.
अमृत-महोत्सव
ncelebration of the seventy-fifth year of India's independence. भारताच स्वतंत्रताच पंच्याहत्तर वर्षाच आचरणोत्सव.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष इ. 2022 वर्षी झाल॑ म्हणून वर्ष पूरा अमृत-महोत्सवाच कार्यक्रम सरकार धामधूमशी / आर्भाटांत चालिवले.
Note
- this word / usage was coined when the Government decided to celebrate the seventy-fifth year of India's independence.
अमोर-सोमोर
advface-to-face. अमोर-समोर. सोमोर-सोमोर. समोर-समोर.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
उदंड दिवसापसून अम्च मध्ये मनस्थाप आहे. अण्कीन अस असणे चोखोट न्हो म्हणून अमोर-समोर बसून पूरा विषय बोलून व्यक्त करींगाला येशीलका ?
Note
- सोमोर of DM is spelt as समोर in sm.
अम्च
pronour. ours. अमच॑. अम्हाला संबंध झालते ; आमचा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हे सोनेच माळ अम्च नहो. तिला ते परतून देऊनटाक.
अम्च-अम्च
pronbelonging to each of us. अम्ही एक-एक दनांचीन / व्यक्तींचीन.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च-अम्च काम व्यवस्थांत करत गेलतर पुरे, तेवढीन बरोर होईल.
अम्मा
nmother. माय ; माता / आई in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दक्षिणी मराठी बोलणार पोणावांटा लोकेनीं त्यंच मायाला अम्मा म्हणून बलावतात, तरीन कित्येकदन आई म्हणून बलावतात.
अम्ही
pronwe. अम्ही ; आम्ही in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
आज संध्याकाळी सहा बडिवाच पुढे / वाजाच पुढे अम्ही तुला पाह्याला येतों.
अम्ही-अम्ही
pronwe by ourselves. अम्ही स्वता. अम्ही अपाप.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च देश उद्धार होम म्हण्जे अमेरिकाकी वेगळ देशकी अम्हाला सहाय करतील म्हणून बसलतर होईना. अम्ही-अम्ही कायतरीन केलतरेच होईल.
अयनक
nspectacles. reading glasses. चश्मा. वाचाच अर्सा. उपनेत्र.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मी मझ पंध्रावां वर्ष पसून अयनक वापरत / घालत आहें.
अयोग्य
adjimproper. unbecoming. unworthy. योग्य नाहीते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
महिला हॉकी संघाच कोचाच वागणे अयोग्य होत॑ म्हणून सरकार त्यंच व॑र एक अन्वेषण आरंभ कराला निश्चय करलाहेत.
अयोग्य
adjunsuitable. unfit. unqualified. लायक नाहीते. नलायक.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
नव होऊन नियुक्त झालते व्यवसाय विभागाच अधिकारी ते पदवीला / स्थानाला अयोग्य आहेत अस निश्चय करून त्यांस कामांतून काडूनटाकले.
अयोग्यता
nunworthiness. योग्याता नाहीस्क असणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
नव होऊन नियुक्त झालते व्यवसाय विभागाच अधिकारीला ते विभागाच नियम काहीनच कळना अणी त्यंच अयोग्यता पाव्हून त्यंच खाले काम करणार अग्गिदनीन त्यंच व॑र थोडकपणीन मर्यादा दाखिवत नाहीत.
अय्यो
interjoh! अरे !
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अय्यो ! मी तला ते काम कर नोको म्हणटलोंकी, मग कां करला ?
Note
- from Tamil.
अय्यो-कुय्यो
interjan expression indicating lazyness, reluctance or unwillingness to act. शोंबेरिपण अथवा आळस अथवा काम कराला सम्मत / उद्देश नाही म्हणून दाखिवाच गोष्ट.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
ते काम कर रे म्हणून मी तला भरून दपा सांगामते पडल॑. नंतर अय्यो-कुय्यो म्हणून कायकी अर्धगछ करून ठिवलाहे.
Note
- from Tamil.
अय्यय्यो
interja double emphasis of अय्यो. अय्योच पुन्हर्स्पष्टापण. अरेरे !
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अय्यय्यो, कां तस करलास ?
Note
- from Tamil.
अरटे
ngossip. idle talk. हरटे. अमुक विषय नाहीते बोली ; गप्पा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च शेदारल॑ घरचांस तीन सून आहेत, ते तीघीन अरटे बडिवणेंत एकापक्षा एक उणे काहीं नाही !
Note
- from Tamil. The corresponding Kannada word is हरटे.
अरटे बडिवणे
vtto gossip. हरटे-बडिवणे (Kannada). अमुक विषय नाहीस्क बोलणे ; गप्पा मारणे in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ एक मित्र आहे. तो अरटे बडिवाला आरंभ केलतर संपिवनाच संपिवना !
Note
- from Tamil.
अरण्य
nforest. राण. वन.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अरण्य विभागांत मला कळ्ळते एक थोर अधिकारी आहेत.
अरळू-मुरळू
adjincoherence in speech. बोलाच रीतींत येयाच अव्यक्तपण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कित्येकदन वय होतां-होतां बोलाच अणी योचना कराच शक्ती उणे होऊन अरळू-मुरळू होतील.
अरव
nTamil. तमिल भाषा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मला अरव बोलाला येत तरीन, वाचालीन लिव्हालीन कळना.
अरवा
adja man whose mother-tongue is Tamil. तमिल मातृभाषाच मनुष.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
गेल सहा महिने पसून अम्च घरच॑ व॑रच खोलींत डॉक्टर परीक्षाला बसणार एक अरवा पोर राह्यलाहे.
Note
- (1) till around 1800 CE the word अरवा meant "one who is not of us", ie, an outsider. (2) the word अरवा is used in Kannada also.
अरविंद
nlotus. कमळीच फूल.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
राजीव अणि अरविंद हे दोनीन कमळीच फूलाच दुसर नाव आहे.
अरवीण
adja woman whose mother-tongue is Tamil. तमिल मातृभाषाच बायको.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दिवसोडी भाजीपाला विकाला अम्च घराला एक अरवीण (बायको) येती.
अरसा
nmirror. अर्सा. प्रतिबिंब दिसाच अरसा ; अरसा / आरसा / अरशी in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अरसा खाले पडून मोडलतर, ते एक अपशकुन म्हणून सांगतात.
अरसा
nglass. नुस्त अर्सा ; काच in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
बीदींत थोर ॲक्सिडन्ड होऊन तिकडे पूरा अरसाच चूर पडलाहे.
अरसा
nspectacles. अर्सा. अयनक. उपनेत्र ; चष्मा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मी बाह्येर / बाहेर गामाला जाताना घालींगून असाच अरसा विना अण्कीन एक अरसा केम्हीन काढींगून जाणे आहे.
अरुण
nthe divine personification of the pre-dawn reddish glow in the eastern horizon, announcing the rising of the Sun god. अरुणोदी सूर्य उदय होयाच पुढे पूर्व दिशांत प्रत्यक्ष होयाच तंबड रंग.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
भारतांत पहिल पहिल पाष्टे अरुण प्रत्यक्ष होयाच ठिकाण झालत्यामळे अरुणाचलप्रदेशाला ते नाव ठिवले.
अरुण
ncharioteer of Sun god. सूर्यदेवाच सारथी.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
सूर्यदेवाच रथ हांकाच / पळिवाच अरुण, कश्यप ऋषीचीन विनताचीन लोंक होऊन उजले.
अरुणोदय
nSunrise. सूर्याच उदय.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
शेतींत काम करणार कुणबी, नांगरणार असलतेनी अग्गीन अरुणोदयाच वेळी कामाला जातील.
अरुणोदि
nday-break. dawn. early morning. अरुण / सूर्य उदय होयाच वेळ. दुस्तपारी. पाष्टे-पाष्टे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
काल अरुणोदि मी बागांत चालाल गेलसतम्हा मझ एक उदंड जुने मित्राला पाह्यलों.
अरुंधती
nname of a star in the constellation of Ursa Major. सप्तऋषि नक्षत्रसमूहांत एक नक्षत्राच नाव.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) सप्तऋषि नक्षत्रसमूहांत जोडीनक्षत्रांत एकाच नाव अरुंधती अणी दुसरेच नाव वसिष्ट म्हणून आहे. (2) वराड झाल समेच नव दंपतीला अरुंधती नक्षत्र दाखिवणे आहे.
Note
- अरुंधती and वसिष्ट correspond to the binary stars (two-star system) of Alcor and Mizar of the constallation of Ursa Major, the Big Dipper. The specialty of this binary system is that both the stars revolve around each other, unlike a normal binary where one star revolves around the other. Thus the purpose in seeing the binary of अरुंधती and वसिष्ट in a Hindu wedding tradition is to emphasise the equal importance of both spouses in a wedlock.
अरुंधती
nwife of Sage Vasishta. वसिष्ट ऋषींच पत्नी.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अरुंधती अणी वसिष्ट ऋषी हे दोघीन एक उत्तम जोडीच उदाहरण आहेत म्हणून वराड झालते दंपतींला अरुंधती नक्षत्र दाखिवणे आहे.
अरे
interja manner of addressing a person (in a condescending manner). एकलाला बलावाच रीती (थोड तुच्छांत).
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अरे, अत्ता बाह्येर गेलतर केम्हा पर्तून येशील तू ?
अरे
interjthe exclamation, oh! अय्यो (Tamil).
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अरे ! तू इकडेच बसलाहेस का, मी पाह्यलोंच नाही की !
अरेरे
interja double emphasis of the exclamation अरे. (Tamil). अरेच पुन्हर्स्पष्टापण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अरेरे, मी म्हणींगट्लों तू तम्हाच गेलास म्हणून, अण्कीन इकडेच बसलाहेसका ?
अर्क
na decoction of coffee. कॉफीच पूडांतून काढलते रस. कॉफीच काढा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
चिकोरी मिळिवलतर कॉफीच अर्क अण्कीन थोड घट्टि होईल.
अर्क
na herbal decoction. वनस्पतीच काढा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
आयुर्वेद औषध / ओखद तय्यार कराच ठिकाणाच जवळ जातानाच वनस्पतीच अर्काच चोखट घम्मग वास कळूनजाईल.
अर्क
noil or essence extracted from certain plants. कित्येक वनस्पतीच द्रव रूपाच सत्त॑ (सत्व).
Used in a sentence · वाक्य प्रयोग
वनिलाच अर्क मिळिवलते दर्बूजाच मिल्क-षेकांत नंखर मीठ घालून पीयाला बेष असेल.
अर्क
na plant belonging to the sollow-wort or milk-weed family. रुई. रुईच झाड (हे झाडाच पान रथसप्तमीच दिवसी कराच सणाच स्नानाला येते).
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) हिंदू संप्रदायांत अर्क एक विशेष झाड म्हणून आहे. रथसप्तमीच दिवसी आंघोळी करताना हेज पान खांदाच व॑र ठींगून स्नान करणे आहे. (2) अर्क झाडाच काठीच मध्य भागांतल पंढ्र रंगाच दिंडांतून केलते देवाच विग्रह फार विशेष म्हणतात.
अर्घ्य
noblation (of water, milk etc) to Gods. पूजाच पाणी अथवा दूध मंत्र सांगत उद्धरणींतून हातावाटी अर्घ्य पात्राला (पेलांत / प्यालांत) सोडून देवाला स्मरण कराच पद्धति.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
गोकुलाष्टमी सणांत लिंबू अणी पैसाच नाणेंत (चिल्लराच) अर्घ्य सोडाच पद्धति आहे.
अर्चना
nworship. पूजाच एक भाग.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अग्गि (अस्कि / सर्व) देऊळांतीन प्रत्येक-प्रत्येक कुटुंबाला स्वता देवाला अर्चना कराला सोडनात तरीन, अम्च नाव सांगून म्हण्जे, अम्च संकलपांत पुरोहित देवाला अर्चना कराच व्यवस्था आहे.
अर्जी
npetition. appeal. विनंती.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
सरकारी साळेंत पंतोजींच उद्योगाला अपेक्षापत्र द्याच शेवटल॑ दिवस एक वाराच पुढेच झाल म्हणून मला कळ्ळ॑ होत नाही. मझ अपेक्षापत्र स्वीकार करिवाला एक अर्जी देलतर काय म्हणून योचना करत आहें.
अर्जी
nformal request.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
भ्रष्टाचारामळे उद्योगांतून काढूनटाकलते ऐ.ए.एस. अधिकारी त्यंच व॑र केलते अन्वेषण बरोर होत नाही अस सांगून, पुन्हा एकदा अन्वेषण करिवाला एक अर्जी त्यंच मोठ अधिकारीला म्हण्जे, चीफ़ सेक्रटरीला देले.
अर्जी
na legal plaint. न्यायकचेरीला द्याच अर्जी.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च वकील बरोर वाद / तर्क केल नाही-ते-करतां केस हरले. हे कारण सांगून कचेरीच निर्णय पुन्हा विचारणा करिवाला मी वेगळ वकीलावाटी एक अर्जी द्याला योचना करत आहें.
अर्थ
nmeaning. मुख्य आशय.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
गोष्टांच अर्थ द्याच ग्रंथाला शब्दकोश अथवा निघंटु म्हण्तात.
अर्थ करिंगणे
vtto get to understand. to make sense of. बरोर योचना करिंगट्लांपिरि समजींगणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मी कसाला अस बोलतों म्हणून अर्थ करिंगट्ला नंतर मला उत्तर दे.
Note
- करिंगट्ला नंतर will be the preferred usage compared to the colloquial करिंगट्लांपिरि.
अर्थ होणे
vito understand. समजणे. समजिंगणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मी बोलाच तला अर्थ होत नाही वाटते. तीन चार दपा पुन्हा पुन्हा सांगिट्ल नंतर थोडक समजले म्हणून वाटते.
अर्थ होणे
vito realise. समजणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
"सरकाराच पैसेचकी, गेलतर जाऊनदे" अस कित्येक लोक म्हणिंगतात. असेच सोडूनटाकलतर खजाना खाली होईल अणि अम्च कर / टॅक्स अग्गीन वाढेत जाईल म्हणून तेनाला अर्थ होत नाही.
अर्थशास्त्र
neconomics. व्यापार, व्यवसाय, उद्योग अणि धन हे विषयांला संबंध झालते शास्त्र.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
भारताच पूर्व प्रधानमंत्री श्री. मनमोहन सिंह अर्थशास्त्राच थोर पंडित होते.
अर्ध
nhalf. दोन पाव.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कित्येक राज्याच करनीती प्रकार आदायाच अर्ध भाग सरकार कर म्हणून वसूल करतील.
अर्धगछ
advhalf-done. अर्धंगछ. अर्धवट. अर्धंपर्द. अर्ध करून सोडणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कित्ती सांगीट्लतरीन अम्च कामवाली कापड बरोर धुवत न्होती. सांगून सांगून पुरे झाल॑. अर्धगछ खळबळून घालणेमळे सोपाच / साबूनाच वास कापडेंत केम्हाहीं / केम्हीन येत होत॑ म्हणून एक "वाषिंग मषीन" घ्याला निश्चय करलों.
Note
- अर्धंपर्द is of Kannada origin.
अर्धचंद्र
nhalf-moon. सप्तमीच चंद्र. अर्ध भाग उजाड अणि अर्ध भाग सावळी असाच चंद्र.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अर्धचंद्र पाह्याच पक्षा चंद्रकोर पाह्याला अवडते मला.
Note
- (1) चंद्रकोर is crescent Moon. (2) उजाड of DM is उजेड in SM. उजाड in SM means desolate.
अर्धरात्रि
nmidnight. मध्यरात्री ; अर्धरात्र in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
श्रावण महिनेच कृष्णपक्षांत अष्टमी रोहिणीच दिवसी अर्धरात्रीच वेळी श्रीकृष्णाच जन्म झाल॑.
अर्धवट
advhalf or partially done in an imperfect manner. अर्ध केलते पणीन बरोर करनास्क सोडणे. अर्धगछ. अर्धंगछ. अर्धंपर्द (Kannada). एडवट॑ (Tamil).
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तिरुपतींत नवसून केंस क्षवर कराला हजामाच सोमोर / समोर बसलतर, तो अर्धवट करून जायनास्क पाह्यींगाम. कारण, अम्हाला तसेच बसिवूनटाकून तो एक नव ग्राकीला (ग्राहकाला) हुडुकिंगून गेलतर, तो वापस येया पर्यंतीन अमी/अमाला तिकडच बसामते पडेल.
अर्धवट
advlimbo. in between stage. अर्धांत सोडलते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
टी.वींत कर्नाटकाच देवुळांच विषयीं एक चोखोट धारावाही गेल महिना आरंभ केल्होते. पण ते अर्धवट स्थितींत, म्हण्जे तीन घटना दाखिवलानंतर सोडूनटाकले / राहते करूनटाकले.
Note
- the word राहते is generally pronounced as राह्ते in DM.
अर्धवेड
neccentric. विचित्र वागणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ व॑र्लाला अर्धवेड म्हणून निश्चय सांगूया, कारण चोखोट सरकारी उद्योग सोडूनटाकून अम्चस्क बनिया कंपनींत घूंसलाहे. ते पणीन उणे धर्मांत.
अर्धक्षवर
figa job left half done. अर्ध करून सोडलते काम / कार्य / विषय.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हे कॉरपरेशन लोक (लोके) एक काम पणीन बरोर करनात. मझ घराच समोरल॑ बीदींत डांबर घालाच काम अर्धक्षवर करून घाट्लाहेत.
Note
- दांबर is alsphat, tar.
अर्धंगछ
advhalf-done. अर्धगछ. अर्धवट. अर्ध करून सोडणे. अर्धंपर्द.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पोणावांटा कंट्राक्टर लोकांस एक स्वभाव आहे, काय म्हणजे, कोण्त काम हातांत काढलतरीन अर्धंगछ करून थोडक दिवसाला ते सोडूनटाकतील.
अर्धंपर्द
adjhalf-done. half-hearted (effort). अर्ध करून सोडलते. अर्धगछ. अर्धंगछ. अर्धवट.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तो यंदा परीक्षा बरोर केल॑ नाही. अर्धंपर्द वाचलतर वेगळ॑ काय होईल ?
Note
- अर्धंपर्द is of Kannada origin.
अर्पणा
noffer-up. dedication. अर्पण करणे ; अर्पण in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
त्यंच बाप अकस्मात मरले म्हणून "विश्व कप" क्रिकट खेळ लंडनांत चालत असताना सचीन टेंडूळकर मुंबैला जामते पडल॑. अंतिम संस्कार झाल नंतर वापस येऊन खेळलते पहिलच खेळांतच मारलते सेन्चुरी त्यंच बापाच नावाला अर्पणा करले.
अर्सा
nmirror. अरसा. प्रतिबिंब दाखिवाच / दिसाच काच ; अरसा / आरसा / अरशी in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
बंडी पळिवताना रोडांत मागे येयाच ट्राफ़िक बरोर पाह्याला काराच आंत अर्सा असत॑.
अर्सा
nspectacles. अरसा. अयनक. उपनेत्र. बरोर वाचाला / दिसाला उपयोग कराच अर्सा ; चष्मा, आरशी, उपनेत्र. also चाळीशी in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
साधारण होऊन चाळीस वर्षाच वय झालवर वाचालीन लिव्हालीन अर्सा पह्जेस्क अस्त.
अर्सा
nplain glass. अरसा. नुस्त अर्सा ; काच in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मी काल बागांत चालाला गेलतम्हा तिकडे खेळत होतते एक लेंकराच पांयेंत अर्सा रुचून वेघून सूळांत तरपडत असाच पाह्यलों.
अर्हता
neligibility. योग्यता.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अठ्रा वर्षाच वये झालत्यांस अम्च देशांत मतदान कराला अर्हता आहे.
अलमारी
ncupboard. कपाट. बीरो.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
जुने काळांत लांकडाच अलमारी सुताराकडून करून घेत होतों, तज नंतर गोदरेज अलमारी आल॑, पण अत्ताअग्गीन मलेश्यांतकी चैनांतकी करलते सवंग अलमारी मिळते.
अलक्ष्य
adjinattention. श्रद्धा नाहीस्क असणे. लक्षा नाहीस्क असणे. ध्यान देनास्क असणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
गेलंदा मझ लोंक परीक्षांत उणे मार्क घेटळा म्हणून साळेच प्रिन्सिपाल मला येऊन पाह्याला सांगून पाठिवले. मझ लोंक वाचणेंत उणावा दाखिवाच कारण पंतोजी शिकीवताना अलक्ष्य होऊन बसतो अस तेनी मला सांगट्ले.
Note
- the DM word उणावा meaning deficiency is उणावाई in sm.
अलंकार
nadornment. beautification. पाह्याला / दिसाला बेष सुंदर करणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अलंकार करींगट्लते पुरे, वराडाला निघाला वेळ झाल॑, ये जाऊया.
अलीकडच॑
adjbelonging to recent times. recently. थोड पुढे. थोड दिवसाच पुढच॑.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अलीकडच अतीवृष्टीमळे पाकिस्तान अणी कश्मीरांत भयंकर नाश-नष्ट झाल॑.
अलीकडच॑
adjbelonging to this side. हे बाजूच.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
नदीच अलीकडच देऊळ फार जवळ आहे. अम्च घरांतून तिकडे जांव / जाम॑ म्हणजे दोन निमिष पुरे मला.
अलीकडे
advrecently. हे जवळ
Used in a sentence · वाक्य प्रयोग
केंद्र उद्योगमंत्री अलीकडे एक नव॑ उद्योग-नियम विधान-सभांत चर्चाल ठिवले.
अलीकडे
advon this side. हे बाजूकडे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कालवाच अलीकडेच जमीनाच मोल अत्ता जास्ति झालाहे.
अलें
nginger plant or its (undried) root. आलें.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) अलें वाळून असलतर तला सुंठ म्हणतों. (2) फ्ळोरिडा-कीच शेवटल॑ द्वीपांत असाच प्रसिद्ध लेखक हेम्मिंग्वेच घर प्हायाला म्हणून अम्ही गेल्होतों (better, जेल होतों). घराच सोमोर / समोर ऊंसांतून रस पिळून विकणार एकला होता. बंडी राह्ते करून उतरतांतरून अम्हाला पाव्हून "भारतांतून येणार सग्ळीन ऊंसाच रसांत अलें चेंचरून घालाल सांगतील, तुम्हालीन / तुम्हाला पणीन तसेच पह्जेका" म्हणून विचारला.
अल्प
adja little. थोड. थोडक. नंखर.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मला आंगाला बर नसताना आयुर्वेद डॉक्टर देलते औषधाच / ओखदाच चूर्ण जेवून अल्प वेळाच नंतर पाणींत मिळिवून गिळाला सांगिट्ले.
अल्पदृष्टि
adjlack of foresight. भविष्यांत होणार विषयावर जास्ति योचना नकरणार.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च नेतांच अल्पदृष्टीच व्यवहारामळे देशाच स्थिति हाळ होत आहे.
अल्पबुद्धि
adjnarrow-minded. mean minded. ल्हाण मनाच.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
राष्ट्रीय कक्षींच अल्पबुद्धीच वागणांमळे समुदायांत गोंधळ पसरते विना वेगळ काहीं होत नाही.
अल्पबुद्धि
adjof limited intelligence. बुद्धिशक्ति उणे असणार.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अल्पबुद्धि लेंकरांस शिकिवाला अम्च गांवांत नव॑ होऊन आरंभ करलते साळेंते मझ लेंक उद्योगांत आहे.
अल्पस्वल्प
adjwhatever little. नंखर थोडक.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
आफ़्रिकाच सोमाळिया देशांत भयंकर क्षाम झालत्यामळे लोक जमीनांत / भूमींत मिळाच अल्पस्वल्प धान्य / धान, वनस्पति हे सग्ळीन खावून पोट भरींगाच स्थितीला आलाहेत.
अल्पायुष
adjshort-lived. उणे आयुषाच.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
स्वामि विवेकानंद, श्रीनिवास रामानुजन असलते महान लोके अल्पायुषाच होते.
अल्पायुष
nshort life. उणे आयुष.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) रामकृष्ण मिषन असल॑ एक थोर संस्था स्वामि विवेकानंदाला त्यंच अल्पायुषांतेच स्थापना कराला झाल॑. (2) मनुषांच जीव सरासरी सत्तर वर्ष अस्त. हेज बरोर पाह्ताना कुत्राच सरासरि बारा वर्षाच जीव अल्पायुषाच म्हणूया.
अल्या
nworm. अळा. किडा. कीडा. कृमि.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हे वर्ष अम्च घरच॑ अंबाच झाडांत भरून पंडू झाल॑, तरीन ते पूरा अल्या खाऊन नाश होऊनगेल॑.
Note
- better अळा instead of अल्या.
अळस
nsloth. laziness. (शों)सोंबेरिपण (Tamil).
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तला काय काम सांगिटलतरीन अळस भोगींगून तजांतून चुकाच वाट पाह्त असतो / अस्तो.
अळा
nworm. maggot. अल्या. कीडा. किडा. कृमि ; अळ / अळी / अळई in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) उदंड दिवस तांदूळ अथवा दाळ उपयोग करनास्क ठिवलतर तजांत अळा येऊनजात॑. (2) चार मिर्सिंगा, नाही थोड करेपाकाच पान / पत्ता तांदूळाच डब्बांत घालून झांकून ठिवलतर अळा येईना. (3) गुलाबाच झुडूपाला (झाडाला) अळा येईनास्क असाला तम्हा-तम्हा औषध / ओखद शिंपडत असाम.
Note
- (1) better अळा instead of अल्या. (2) in DM the word झाड is used for both tree and bush. In DM the word झुडूप is also used in combination with झाड ; viz झाड-झुडूप, particularly when it is intended to mean "trees and shrubs".
अळु
na variety of edible tuber. colocasia. अळूच गड्डे. मूळाच एक गड्डे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अळु घेताना बरोर प्हाऊन / प्हावून घेंव, कां म्हणजे कित्येक वर्गाच अळु खालतर घसाला कंड (खाज) येईल.
अवकाश
nright (to act). हक्क.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
भारताच राष्ट्रपति देशाच प्रथम नागरीक झालतरीन विधानसभाच शिफारस / सम्मत नाहीस्क नव नियम कराच अवकाश त्यांस नाही.
Note
- The word अवकाश has a totally different meaning in SM, quite different from what DMs understand it as. In SM it means "time, leisure, space, interval" etc. For DMs the meaning is aikin to that in Malayalam, Tamil or Kannada. In Malayalam and Tamil अवकाशम means "right". In Kannada it means "chance" and by extension "scope". In Sanskrit it means "scope, occasion, space, interval, footing".
अवगणना
ndisregard bordering on disrespect. मर्यादा देनास्क परवा करनास्क असणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पाकिस्थानाच राष्ट्रपति तिकडल॑ प्रधान नागरीक असून पणीन ते राज्याला संबंध झालते मुख्य निर्णय सग्ळीन तिकडल॑ सेनाप्रमुख, राष्ट्रपतीला अवगणना करून काढतात अस सर्वानीं कळ्ळतेच.
अवगणना
nneglect. काहीन करनास्क सोडूनटाकणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
लेंकरांच वाचणे अवगणना करलतर तेनी थोरळे होताना चोखट / चोखोट उद्योग मिळाला कष्टि भोगतील.
अवघड
adjwastrel. a lazy person who wastes time or money. कसालीं प्रयोजन नाहीते मनुष.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
ल्हानपणांत तज बाप-माय तला बरोर पाह्यींगट्ले नाही-ते-करतां अत्ता तो एक अवघड झालाहे.
अवघड
adjboorish and ill-mannered. मूर्खपणाच.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ घरच दुसर॑ माडी अत्ता-अत्ता खाली झालाहे. भाडेला अवघड मनुष कोणीन येताने अस मी देवाला दिवसोडि प्रार्थना करतोंहें.
अवघड
adjcomplicated and problematic. गुंतागुंतीच (प्रश्न).
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तीन वर्षापसून चालत असाच रष्या यूक्रेन युद्ध लोक्कुर संपाच लक्षण दिसत नाही. दिवसों दिवस परिस्थिति अवघड होत आहे.
अवड
nliking. इष्ट. इच्छा. आग्रह ; आवड in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) तुला तज बरोर जायाच अवडलतर जा, अवडलनाहीतर जाणे नको. (2) आज करलते खीर फार बेष होत॑. लेंकरे अस्कीन अवडिंगून खायले / खाय्ले.
Note
- the related SM word निवड meaning "selection, choice" is almost unknown to DMs.
अवडणे
vi & vtto like. इष्ट वाटणे. इष्ट होणे ; आवडणे in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
इथपर (इत्तिपर) मला काय अवडते, हे पाव्हून एक प्रयोजनीं नाही. तुला काय अवडतेकी तेच करत जा.
अवतरणे
vito incarnate. अवतार होणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
भूलोकांत देवाच अवतरणे कां होते, हेज विषीन गीतोपदेशांत अर्जुनाला श्रीकृष्ण स्पष्टविणी उपदेश केलाहेत.
अवतार
nGod's incarnation on Earth. भूलोकांत देव जन्म काढणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
महाविष्णूच दहा अवतारांत नौ झालाहे. शेवट्ल॑ अवतार म्हाण्जे, कल्कि अवतार इथपर / इत्तिपर होईल.
अवतार
figunsightly dress or appearance. विकार वेष-भूष.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्ही लेंकरे कोणीन त्यांस अवडनाते वेष-भूष घालिंगून बसलतर अम्च आजिम्मा सांगतील, "तज वेष प्हा, काय अवतारकी !" म्हणून.
अवधूत
none who has given up earthly attachments. वैरागी. बैरागी. लौकीक विषय सोडलते संत.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अवधूत संप्रदायांत शिरडी साई बाबा एक महान होते.
अवधूत
figirresponsible person. जवाबदारी सोडून बसलते व्यक्ति.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तो अत्ता-अत्ता सन्यास घेटला अस ऐकून मला आश्चर्य काहीं झाल नाही. कुटुंबाच जवाबदारी सांभाळणे / समाळणे तला एक मोठ प्रयास म्हणून अस्किदनालीन कळ्ळतेच. नुस्त अवधूतास्क हिंडणेच तला इष्ट.
अवमान
ninsult. disrespect. तुच्छ रीतीच वागणे. अपमान.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) अम्च पक्षा ल्हाण स्थितींत असणारांला ते एकच कारणाकरतां अवमान करणे चोखोट न्हो. (2) दुसरेंला अवमान दाखिवाच एक चोखोट स्वभाव न्हो म्हणून ल्हाण वयेंतूनच लेंकरांला शिकिवाच अम्च जवाबदारी अणी धर्म पणीन आहे.
अवमान
nshame. अपमान. लज्जा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च जीवन अम्ही केम्हीन गौरवांत चालीवलतर अवमान भोगाच अवसर कधीन येईना.
अवमान
ndisgrace. humiliation. अपमान. पह्जती.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मी तजकडे उगे अस॑ बोलत होतों तरीन, तज मनांत मी तला अवमान करून बोललों म्हणून वाटल॑.
अवयव
npart of body. देहाच भाग. आंगाच भाग.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
वैद्यशास्त्र केवढ॑ सुधार झालाहे म्हणजे हृदय, डोळे, मूत्राशय असलते अवयव नाश झाल तरीन शस्त्रक्रिया करून दुसरेंकडून ते अम्च आंगाला जोडाला होईल.
अवलक्षण
adjweird-looking. पाह्याला विकार असाच. विलक्षण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हे काळाच कित्येक पोरी शृंगार करिंगतें म्हणून कसकसकी वेष घालिंगून तसच, तोंडाला कायकायकी लाविंगून अवलक्षण करिंगतात.
अवलक्षण
nevil omen. ओंगळ / वंगळ लक्षण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
नव घरांत वेघतानाच घरच॑ दिवा विजलते एक अवलक्षण म्हणून तिला वाटल॑. हेला महत्व काहीं नाही म्हणून कित्ति सांगिट्लतरीन तिन॑ ऐकाला तय्यार न्होती.
अवळा
ngooseberry. अंबट रूचाच एक फळ ; आवळा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अवळा, अलें, पाला असलते पदार्थ अयितवार (आदित्यवार) संपाकांत मिळिवणे की खाणे की श्रेष्ट नहो अस म्हणणे आहे.
अवळा घालून बेल तोडणे
figa saying denoting "to use a small fish to catch a big fish". to take small initiatives to achieve big results. उणे श्रमांत थोर काम हेणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पाकिस्थानाला भारताच बरोर समोर-समोर युद्ध कराला शक्ती नाही म्हणून आतंगवादींला सोडून अम्हाला उपद्रव कराच, अवळा घालून बेल तोडाच सम म्हणून सांगुया.
अवळीजावळी
adjtwins. एकेच प्रसवांत दोन लेंकरे ; आवळाजावळा / जुळी-मुले in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
एक दिवस एकच ठिकाणी एकसारख असाच तीन जोडी अवळीजावळींस पाव्हून आश्चर्य वाटल॑ मला.
अवशिष्ट
adjremaining. left over. बाकी उरलते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कुवैत युद्धांत अमेरिका एक पूरा महिना प्ळेनांतून बॉम्ब घालून इराक्की सैन्याला ध्वंस करले अणी तज नंतर इराक्की सैन्याच अवशिष्ट भाग दोन दिवसाच आंत आत्मसमर्पण करले.
अवशिष्ट
nresidue. remnant. उरलते भाग.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
शिकारांत धरलते प्राणींला संपूर्णविणी खायाच, म्हणजे अवशिष्ट काहीं सोडनास्क खायाच दंडक / स्वभाव ॲफ्रिकाच हयिना-मृगाला आहे.
अवशेष
nresidue. remnant. उरलते भाग.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
जपानाच हीरोषिमा अणी नागासाकि हे दोन पटणाच व॑र ॲटम-बॉम्ब पडून अवशेष काहीं नाहीस्क झाल॑.
अवशेष
nremaining quantity or number. उरलते माप अथवा संख्या.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
वरमहालक्ष्मी पूजाच दिवसी बलावलते लोकांस तांबूलाच बरोर द्याला तीन डसन नारळे आणिवलों. त्यांत अत्ता अवशेषविणी नुस्त दोन नारळ मात्र आहे.
अवश्य
advsurely. certainly. अगत्य. कंडिप (Tamil).
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तुम्ही आले विना एक काम पणीन होणार नाही. अवश्य येऊनेच सरांव॑.
अवसर
nurgency. समेच कराम म्हणून वाटाच.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तू वाणीच दुकानाला केम्हातरीन गेलतर॑ मला एक नारळ, थोडक चिंच, एक किलो तुरीच दाळ अणी सहा काडीचपेटी हे अग्गीन घेईंगून आणाला होईलका ? अवसर काहीं नाही, तुला सौकर्य मिळताना पुरे.
Note
- (1) वाणी is grocer, one who deals in वाणिज्य of grocery. (2) using the word अवसर to mean "urgency" is a Tamil import. (3) समेच of DM is सवेचि or सवे in SM.
अवसर
nopportunity. अनुकूल समय.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तो एक षाणा / शाणा. अवसर पाव्हून तज काम करिंगतो.
अवसर
noccasion. वेळ. समय.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मझ भाऊच लेंकीच वराड गेल महिना झाल॑. तेच अवसरांत तिज भाऊच मुंज पणीन करूनटाकले.
अवसर
nbusy. preoccupied. कामामळे वेळ नाहीस्क असणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) अत्ता आग्गीन मी उदंड अवसरांत आहें. तरीन, उद्या बरोर साडे-चार घंटेला आलतर मी तुला पाह्तों. (2) उद्याहीं परमाहीं तुम्ही अवसरांत असतील म्हणजे मी उद्या-नाही-तेरमा येवून पाहिलतर तुम्हाला सौकर्य असेलका ?
अवसर भोगणे
vtto be impatient because of urgency. आतर दाखिवणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) ट्रैन निघाला अण्खीन उदंड वेळ आहे. स्टेषनाला अम्ही बरोरल वेळालच जाऊन पावाला जातों, अवसर भोगनाकांत. (2) तुला ट्रैनाला वेळ झाल म्हणून मला कळ्ळ॑ / कळेल. अवसर भोग नोको. मी तुला बरोरल समयाच पुढे स्टेषनांत सोडतों.
Note
- (1) आतुर of SM and आतर of DM have similar contextual meanings ie, impatient, excited. (2) आतर of DM is a morphed form of आतुर of SM. It is also a loan-word from Tamil.
अवसान
nthe end. शेवटीच (भाग).
Used in a sentence · वाक्य प्रयोग
रात्रि उशीर झाल-ते-करतां अम्ही सिनिमाच शेवटी पर्यंतीन राह्यलों नाही. खाणीच अवसान भाग दुसर दिवस विचारींगून कळींगट्लों.
अवस्था
nstate. condition. स्थिती.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
वैरल जेरामळे मझ मित्राला काल हॅस्पिटलांत मिळिवले. आज त्यंच अवस्था कळाला मी जाऊन पाह्मे.
अवस्था
ndifficulty. कष्ट.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च खेडेगांवांत डांबराच पक्का बीद नाही. प्रति वर्ष पाऊसाळाच समय पटणांतून सामान आणाच सगळ॑ बैलबंडीईं चिक्कोलांत सांपडिंगून भोगाच अवस्था पाह्याला होत नाही.
अवंतण
nformal invitation for an event. आवंतण. आमंत्रण. निमंतण. एक कार्यक्रमांत भाग काढाला उपचारविणी बलावणे ; आवंतणे / औंतण / औतण in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अत्तच॑ नव॑ काळांत वराड, मुंजि असलते शुभ कार्यक्रमाला घरोघरी जाऊन हळदि-कुंकू अणी अक्षता देवून, थोरळेयांस नमस्कार करून बलावाच दंडक हे पिढीच लोके सोडूनटाकलाहेत वाटत॑. नुस्त ई-मेलांत अवंतण देलतर पुरे म्हणून म्हणिंगट्लाहेत की काय की.
Note
- the DM pronunciation tends more towards अवंतण than आवंतण.
अवंदर
adjdisorderly. untidy. cluttered. helter-skelter. haphazard. गजबिज. तेरा-पेरा. गंदरा-घोळा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
त्यंच घराच "प्लान" बर आहे. तसच, त्यंच "फ़रनीचर" पणीन भेष आहे. झाल तरीन घर अवंदरांत / अवंदर होऊन ठींगट्लाहेत.
Note
- from Kannada.
अविकारी
gramindeclinable. words that always remain unchanged, without changing in line with gender, number, case, context etc. विकार होइनाते गोष्ट. लिंग, काळ असलते व्याकरणीय प्रयोगामळे रूप बदलनाते गोष्ट. (व्याकरण)
अवियल
na dish made from a variety of vegetables. विध-विध दिनसाच भाजीपाला घालून कराच एक पदार्थ.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
केरलांत कोण्त होटलांत जेवाला गेलतरीन अवियल निश्चय मिळल.
Note
- (1) from Malayalam. (2) दिनस in Tamil and Malayalam means variety of commodities. In SM it is जिन्नस.
अवेळ
vinappropriate time. अशुभ वेळ. योग्य नाहीते वेळ.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कोण्त तरीन चोखोट / चोखट काम कराम म्हण्जे, राहु काळास्क अवेळ काळांत करताने म्हणतील.
अव्यय
gramindeclinable. विकार होयाला साध्य नाहीते गोष्ट. अविकारि. (व्याकरण)
अशुद्ध
adjpolluted. शुद्ध नाहीते. मळक.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
नदींच बाजू असाच पट्णांचीं गांवांचीं मोरींत्सून येयाच मळक / घाणक पाणी नदींत मिळून देशाच सर्व नदीईं अशुद्ध झालाहे.
अशुद्ध
adjimpure. शुद्ध नाहीते. मळक.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
सत्रावां शतकाच नंतर तंजावूर मराठी अणी पुणे मराठी वेगळ वेगळ गतींत पुढे गेल॑. असूनीं, लोकांच मनांत तंजावूर मराठी पूणे मराठीच एक अशुद्ध रूप आहे अस एक चूक अभिप्राय आहे.
अशुभ
adjinauspicious. शुभ नाहीते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दुर्योधनाच जन्म एक अशुभ वेळांत झाल म्हणतात.
अशोक
nname of a tree. एक झाडाच नाव.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
लंकापुरींत रावणासुर सीतादेवीला अशोक वनांत कैद करून ठिवल्होता.
अशोक
adjcheerful. संतोष. शोक नसणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
"अशोक" हे शब्दाच अर्थ "शोक नाहीते" म्हणून कळनास्कच भरून लोक त्यंच लेंकरांच नाव अशोक म्हणून ठिवींगतात !
अश्रद्धा
ninattentive. अलक्ष्य. श्रद्धा दाखिवनाते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कोण्तीन एक विषय बरोर मनांत अर्थ होम म्हणजे ते ऐकताना / वाचताना अश्रद्धांत अस्ताने.
अश्लील
adjobscene. अश्लील.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कित्येक टी.वी कार्यक्रम एवढे अश्लील अस्त म्हण्जे, तसलते अस्कीन पूरा "सेन्सर" करणेच चोखोट / चोखट.
अश्व
nhorse. घोडा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अश्व-रूपी महाविष्णु श्री वादिराजतीर्थाकडून हयग्रीव-मंडि प्रसाद घेऊन खायले / खाले म्हणून मध्व परंपराच लोके विश्वास करतात.
अश्वगंधा
na plant with medicinal properties. एक औषधाच झाडाच नाव.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अश्वगंधा झाडाच वाळिवलते मूळाच पूडांतून आयुर्वेद औषध / ओखद करणे आहे.
अश्वथ
npipal tree. पिपळ झाड.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हिंदू धर्म संप्रदायांत अश्वथ वृक्षाला एक महत्वपूर्ण स्थान आहे.
अश्वमेध
nhorse-sacrifice. घोडाला बलि देवून कराच एक यज्ञाच नाव.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
जुने काळांत भरतवर्षांत अश्वमेध यज्ञ प्राबल्यांत होत॑ अणी महाभारतांत युद्धाच नंतर पांडव हे यज्ञ करलते सांगिट्लाहे.
अश्विनी
nname of the first of the twenty-seven stars in the Indian astrological system. ज्योतिषशास्त्रांतल॑ सत्तावीस नक्षत्रांत पहिलच नक्षत्राच नाव.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कित्येक पोरींच नाव अश्विनी म्हणून ऐकतानाच पोणावांटा पक्षा अमास कळूनजात॑, जातकाप्रमाण त्यंच नक्षत्र अश्विनी असेल म्हणून.
अष्ट
neight. आठ.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हिंदू संप्रदायाच अनुसार आठ दिशा (दिक्) आहे अणी हे अष्ट दिशालीन दिग्पालक असतात.
अष्टमी
neighth day of each lunar fortnight. प्रत्येक पक्षांतल आठवां दिवस.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
एक एक पक्षांतीन नवमीच पुढे अष्टमी येत.
अस
advin this manner. thus. हे प्रकार. हे तर. हे रीत. हे विध ; असा / अशी in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तू मझकडे अस बोल नोको, मर्यादा देऊन बोल.
अस
adjof this type. हे तराच. हे रीतीच. हे विधाच. हे प्रकारच. असल॑. असलते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मी दाखिवाच लुगडे सारख मिळ्ल नाहीतरीन परवा नाही, अस असाच कोण्त मिळतेकी ते आण.
असट
adjdilute. thin. अस्सट. नित्तळ.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
डांगर कालिवताना बरोरल घट्टी असनास्क असट होऊनगेलतर तज रूच हाळ होईल.
असटभाजी
ngravy curry. नित्तल भाजी.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्ही पंजाबी पदार्थ विकाच होटलाला जाताना दोन घट्टिभाजी अणी एक असटभाजी विचारून घेतों.
असणे
vito be. असणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) एक गुंप होऊन बाह्येर गामाला / गावांला जाताना त्यंच-त्यंच सामानाच व॑र त्यंच-त्यंच गवन असणे चोखोट. (2) तुम्ही षाणे / शाणे असुया. पण, तो एक ढेंग म्हणून सांगून तला अवमान कराच आवश्य न्होत॑.
असणे
vito exist. असणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
गुळ्चीट अंबाच आंत कीडा असणे सहजेच.
असणे
vito stay. to reside. राहणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तुम्ही अम्च गांवांला / गामाला येतांत अस मला कळ्ळ॑. कोठ असतांत म्हणून मला कळिवलतर मी तुम्हाला येऊन पाह्तों.
असणे
vito remain. to retain. (बाकी) उरणे. (बाकी) ठिवणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
आजच खर्च सोडून, हातराखणाला पांचशे रुपे असणे चोखोट / चोखट.
असणे
vito wait (for some time). (थोड वेळाला) थांबणे.
Note
- 1. used in context of time. 2. the imperative form of this verb is ऐस and this appears to be a direct translation of the Tamil word இரூ (wait). 3. The Old Marathi word ऐसणे which is hardly used nowadays corresponds to असणे. The DM uasage ऐस though it traces its root to ऐसणे is more linked to the Tamil usage இரூ (wait).
असतस
adjso-so. of nothing special. साधारणाच. काहीं विशेष म्हणून सांगाला होयनाते ; असातसा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
फार बेष आहे, नव॑ डिसैनाच आहे अस म्हणून तिन दीड / देड लाख रुपे देऊन घेट्लते नव सोनेच माळ मला दाखिवली. मला कायकी ते अवडल॑ नाही, असतस आहे.
असतस
advby hook or by crook. somehow or the other. कसतरीं. कसकी. चुकून-माकून. चुकून-पिकून ; असातसा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तो वाचणांत षाणा काहीं न्हो. असतस एस.एस.एल.सी संपीवलतेच / जिंतलतेच एक थोर विषय म्हणून सांगुया.
असत्य
nfalsehood. lie. लटक. लबाड.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
असत्य बोलणारांस पाह्यलतर मला अवडनाच अवडना.
असत्य
nunreal. माया.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
श्री शंकराचार्यांच अद्वैत सिद्धांताप्रकार हे ब्रह्मांड एक असत्य अथवा माया आहे.
असनास्क
adj(as if) not existing or prevailing. न असून.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
काहीन असनास्केच थोर पैसावंत म्हणून तो अपाप सांगिंगतो. खरेविणि पैसावंत असलतर काय सांगाल जातोकी ?
असभ्य
adjindecent. vulgar. असभ्य.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पूरा रात्री घरच समोरल बीदींत दोन पीकोरांच / पीखोरांच असभ्य गोष्ट ऐकून मला कंटाळा वाटल॑.
असभ्य भाषा
nunpolished language. असंस्कृत गोष्ट.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अक्रावां शतकांत कश्मीर देशांत सोमदेवकवी संस्कृतांत कथासरितसागरा रचना करले. हे महाग्रंथांत असाच अनेक कथा सातवां शतकांत पैशाची म्हणाच एक असभ्य भाषांत गुणाध्या लिव्हलते बृहतकथांतून काढलते म्हणून पंडितलोक सांगतात.
असमाधान
ndiscontent. dissatisfaction. तृप्ति नसणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पैसेच वेड असणारांला ते कित्ती असलतरीन मनाला समाधान असना, म्हण्जे सदा तेनी / त्यनी असमाधानांत अस्तील.
असमाधान
ndispleasure. संतोष नसणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्ही समुदायांत वागताना कित्येकदा अम्हाला इष्ट नाहीते कायतरीन होईलच. तसल॑ वेळ अम्च असमाधान व्यक्त कराच पुढे बरोर योचना करणे चोखोट.
असल
adjgenuine. अस्सल. यथार्थ रूपाच. खर॑.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
बाज़ारांत नकली औषध / ओखद विकणे सर्वसाधारण झालाहे-ते-करतां असली ओखद विकाच दुकान कळिंगून ठिवणे चोखोट / चोखट.
असल
adjoriginal. अस्सल. मूल रूपाच.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
असल जास्वंदाच फूल चोखोट तंबड रंगांत अस्त, पण अत्तच हैब्रिड जास्वंद विध विध रंगाच अस्त.
Note
- जास्वंद, hibiscus. shoe flower.
असल
nfinancial capital. अस्सल. बंडवाळ
Used in a sentence · वाक्य प्रयोग
बिसिनस आरंभ कराला अत्ता भरून वेन्चर कॅपिटल फंड्स असल देतात. तेमळे हे काळांत एक नव बिसिनस आरंभ करणे तेवढ कष्ट नाही. Note बंडवाळ is भांडवल in sm.
असल॑
adjof this type or kind. हे सर्खच॑. हे मादरीच॑. हे प्रकारच॑. असलते ; असला in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
यंदा तू घेऊन आणलते अंबा बेष होत॑. इथपर / इत्तिपर असलतेच आण.
असल॑-असल॑
uof this type or kind. हे सार्खच॑ अण्खीन वेगळ वेगळ.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मी सांगिट्लते तुला बरोर समझल नाहीतर मी दाखिवाच लुगडे प्हा, अणी ते दुकानांत असल॑-असल॑ वेगळ॑ कित्ति असलतरीन आण.
असल॑-तसल॑
usomewhat similar, but not exactly identical. एकच सार्खाच नसलतरीन जवळ-जवळ तसलते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तू सिंगपूराला जाऊन येताना मी विचारलते मोबैल-फोणेच आणाम / आणांव. ते मिळ्ळ॑ नाही म्हणून असल-तसल काहीं आण नोको.
Note
- normally said with a negative intent or spin.
असलास्क-असून
advwithout any prior hint. all of a sudden. अकस्मात. पुढे काहीं कळिवनास्क.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तला मनाच प्रश्न काहीं न्होत तरीन असलास्क-असून वेड धरल॑ अस मी ऐकलों.
असाधारण
adjrare. uncommon. extraordinary. उदंड अप्रूप. फार अप्रूप.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तो एक असाधारण बुद्धीवंत. तज पूरा वाचणे स्कॉळरषिपांतेच झाल॑.
असाध्य
adjthat which is impossible to attain or get. साध्य होयनाते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तू बरोर प्रयत्न केल नाहीतर तुला ते काम मिळणे असाध्य होईल.
असामान्य
adjextraordinary. फार विशेषाच. असाधारण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
इषोबशास्त्रांत श्रीनिवास रामानुजन एक असामान्य मनुष होते.
असुख
nmental or physical discomfort or distress. आंगाच अथवा मनाच कष्ट.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) तुम्च कुटुंबाला एवढ॑ दिवस फार कष्ट सोसामते पडले म्हणून ऐकलों. तुम्ही अण्खी तुम्च कुटुंब हे असुखांतून लोक्कर / लोकुर सु्टलतर अम्ही अस्किदनालीन उदंड संतोष वाटेल. (2) चार दिवसापसून पंतोजी साळेला आल नाहीत. विचारताना, तेनी असुख होऊन हॉसपिटलांत आहेत म्हणून कळ्ल॑.
असुया
indbe it. may be.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) तो बोलाच सगळीन लबाड / लटक असुया म्हणींग नोको. (2) काल घेट्लते दहा अंबांत दोन-तीन कीडा वेघलते असुया.
असुर
ndemon. राक्षस.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पह्यिल पह्यिल, म्हणजे ऋग्वेदाच आरंभ काळांत असुर अणी सुर अस दोन वर्गाच देव होते. पण जातान-जातान असुर म्हणाच गोष्टाच अर्थ बदलून "राक्षस" म्हणून झाल॑.
Note
- It is probable that this change happened due the application of a grammatical rule as per which when "अ" is prefxed to a word it gets transformed to its antonym.
असूया
nenvy. jealousy. दुसरांच सुख, संतोष पाव्हून मनाला कष्ट वाटणे. पोटजाळ.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दुसरेंला पाव्हून असूया वाटाच पक्षा, अम्हालीन संतोष सुख हे सग्ळीन बरोरल वाटेंत कस मिळूया हे योचना कराच एक सात्विक गुण आहे.
असूं
ntear drops. आंसूं. डोळेंतून गळाच पाणी ; अश्रू in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) तीन दिवसापसून मझ उजव डोळे तंबड होऊन डोळेंतून असूं गळत आहे, डोळे-डॉक्टराला दाखिवालापणीन मला वेळ नाही. (2) अग्गिदनांसीन होयास्क मझ बहिणीला (बहीणाला) कांदा चिरताना डोळेंतून असूं येईना.
असौकर्य
adjinconvenience. कराला सौकर्य नसाच.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मला कोयंबत्तूरला अवसरान जाम॑. मी गांवांत नसताना मला एक दोन कागद येऊया. तुम्हाला असौकर्य नाहीतर ते घेऊन ठिवाला होईलका ?
अस्कीन
proneverything. all. अस्गीन. अग्गीन. सग्ळीन. पूराहीं.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हे खोली अत्ताच खाली करून देम॑. आंत असाच सामान अस्कीन काढून बाहेर ठिवा.
Note
- (1) अख्खा in sm means "full" / "entire". (2) The word अग्गि / अग्गीं / अग्गीन appears to be a morphed version of अख्खि / अख्खीं / अख्खीन. (3) अस्कीन appears to be compound word of अस and अग्गीन morphed to अस्कीन; अस+अग्गीन = अस्गीन or अस्कीन.
अस्गीन
proneverything. all. अस्कीन. अग्गीन. सग्ळीन. पूराहीं.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
यंदा अम्च घरच॑ अंबाच झाडांत सुमार दोनशें अंबा मिळ्ळ॑. त्यांत पोणावांटाहीं मठाला देऊनटाकून उरलते अस्गीन कापून लोणचे घालूनटाकलों.
Note
- (1) अख्खा in sm means "full"/"entire". (2) The word अग्गि / अग्गीं / अग्गीन appears to be a morphed version of अख्खि / अख्खीं / अख्खीन. (3) अस्कीन appears to be compound word of अस and अग्गीन morphed to अस्कीन; अस+अग्गीन = अस्गीन or अस्कीन.
अस्तमन
nsetting (of Sun, Moon or stars). (सूर्याच /चंद्राच /नक्षत्रांच) अस्तमान ; अस्तमान / अस्त in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
बीदीच दिवा नसताना सूर्याच अस्तमन झालांपिरि/झालानंतर बाहेर हिंडणे चखोट न्हो.
अस्त्र
narrow. बाण. धनुषांतूं सोडाच आयुध / शस्त्र.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
महाभारत, रामायण असलते महाकाव्यांत ब्रह्मास्त्राला सगळ्याचीन पक्षा शक्तिशाली अस्त्र म्हणून सांगिट्लाहे.
अस्तिवार
nfoundation. पाया.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
घर अथवा एक बांधणी घट्टि असाम /असांव म्हणजे तज अस्तिवार बरोर असाम.
अस्ती
nbone. हड. अस्थी.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कोटानकोटी वर्षाच पुढे भूलोकांत जीवंत होतते डैनॅसरांच अस्थि मातीच आंत तेवढ॑ वर्षीन झांकून असून कालभेदामळे फॉसिल होत॑, अस जीवशास्त्रज्ञ सांगतात.
अस्ती
nresidual bones and ashes after cremation. अस्थी. शवसंस्कार करून उरलते चिताभस्म.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
शवसंस्काराच नंतर स्मशानाला (श्मशानाला) जाऊन पुढच॑ कार्यक्रमाला अस्थि वेंचून काढणे आहे.
अस्थिविसर्जन
nritual disposal of the remains of cremation ashes in sea or river. अस्तिविसर्जन. शवसंस्काराच नंतर अस्थि समुद्र अथवा नदींत मिळिवाच विधि.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
बंगळूरांत असणार लोके साधरण होऊन श्रीरंगपटणांत कावेरी नदींत अस्थिविसर्जन कराला जातात.
अस्थी
nbone. हड. अस्ती.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कोटानकोटी वर्षाच पुढे भूलोकांत जीवंत होतते डैनॅसरांच अस्थि मातीच आंत तेवढ॑ वर्षीन झांकून असून कालभेदामळे फॉसिल होत॑, अस जीवशास्त्रज्ञ सांगतात.
अस्थी
nresidual bones and ashes after cremation. अस्ती. शवसंस्कार करून उरलते चिताभस्म.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
शवसंस्काराच नंतर स्मशानाला (श्मशानाला) जाऊन पुढच॑ कार्यक्रमाला अस्थि वेंचून काढणे आहे.
अस्पष्ट
adjunclear. स्पष्ट नाहीते. अव्यक्त. व्यक्त नाहीते.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
परालिटिक स्ट्रोक झाल नंतर त्यंच बोली फार अस्पष्ट झालाहे.
अस्वस्थ
adjrestless. ill at ease. अशांत.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तीन महिना पसून तला मनांत गोंधळ होत असाच मी पाह्त आहें. मनाच अस्वस्थतामळे रात्री झोंप येत नाही अणी झोंपीच मात्रा घेत आहें म्हणून मला सांगिट्ला.
अस्विज
nseventh month of Saka year. हिंदू पंचांगांत सातवां महिना.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
नवरात्रीच सण अस्विज महिनांत येत॑.
अस्सल
adjgenuine. असल. यथार्थ रूपाच. खर॑.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
प्हायाला अस्सल म्हणून असाच बायकेंच हॅन्ड-बॅग, षूस असलते अग्गीन नकलीच पणीन येत आहे अणी विषय कळनाते बायके बेष एमारूनजातात.
अस्सल
adjoriginal. असल. मूल रूपाच.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अस्सल चंदनाच लांकडेच बद्दिल नकली चंदनाच लांकड विकून, म्हणजे नुस्त व॑रून चंदनाच वासाच रसायन स्प्रे करून, तो कुप्पा कुप्पा पैसे करला.
अस्सल
nfinancial capital. असल. बंडवाळ.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
एक लाख रुपेच अस्सल घालून बिसिनस आरंभ केलते मनुष अत्ता कोटानुकोटी संपादत आहे. Note बंडवाळ is भांडवल in sm.
अहंकार
nhaughtiness. pride. conceit. egoism. अहंभाव. स्वता गर्व वाटणे. स्वता मोठ मनुष म्हणींगणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अहंकार असाच मनुषाला दुसरेंच चोखट / चोखोट उपदेश पणीन तज मनाला बरोर पडल॑ नाहीतर इष्ट होईना.
अहंकारी
adjone who is haughty, proud, conceited or egoistic. गर्विष्ट.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
रावण अणी हिरण्यकषिपु हे दोनीं मोठ अहंकारी राक्षस होते.
अहंभाव
nhaughtiness. pride. conceit. egoism. अहंकार. स्वता गर्व वाटणे. स्वता मोठ मनुष म्हणींगणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अहंभाव असणार त्यंचस्कच अण्कीन एक व्यक्तीला पाह्यलतर लोक्कुरच वरडा-वरडी आरंभ होईल.
अहिंसा
adjnon-violence. हिंसा विरुद्ध. दुसरेंना हिंसा करनास्क असणे, हे सिद्धांत.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अहिंसा सिद्धांत महात्मा गांधीच जीवनाच प्रधान भागविणि होत॑.
अहेर
ngifts given at a wedding, upanayana, religious functions etc. वराड, मुंजि अणी दुसर॑ सणाच वेळ द्याच भेट. आहेर.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
वराडाला बलावाला येतानाच (आमंत्रण पत्र द्याला येतानाच) अहेर पणीन द्याच संप्रदाय अत्ता हे काळांत आरंभ जालाहे.
Note
- better अहेर.
अहो
inda vocative used while addressing a person with respect. मर्यादांतून / मर्यादान एक व्यक्तीला बलावाच एक गोष्ट.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
एक दोन पिढीच पुढे दल्लाला बाईल अहो म्हणून बलावाच सहज होत॑ तरीन, हे काळांत नाव सांगून बलवाच दंडक आरंभ झालहे.
अक्षण
narathi done by two ladies holding a silver or brass plate containing haldi-kumkum-akshata mixed water (without lamp), as an auspicious act of blessing or wishing someone well. पितळेच अथवा चांदीच (रुपेच) ताटांत हळदी-कुंकू-अक्षताच पाणी घालून (वाताच अथवा कापूराच समी ठिवनास्क॑) बाइका ओवाळून लोकाना मंगळाशंसा अथवा आशीर्वाद करणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अठांगुळाच वेळी गरवार बायकोला अक्षण करणे आहे.
अक्षता
na caste mark applied on the forehead by men of Madhwa sect signifying consuming of food as God's prasad after morning puja. पाष्टच देवपूजा झालांपिरी तीर्थप्रसाद घ्याच वेळी मध्व संप्रयादाच दादिगे / दाद्ग्ये कपाळांत लावाच चिन्ह.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) मध्व संप्रदायाच दादिगे त्यंच कपाळांत अक्षता घालींगट्लाहेत म्हण्जे त्यंच पाष्टेच पूजा झाल॑ म्हणून अर्थ. (2) वाळून पूड करलते केळीच फूलाच चिप्पाहीं हळेदहीं मिळिवून अक्षता कतात. (3) एकादशीच दिवसी अक्षता लावणे नही.
अक्षता
nthe paste used for applying the caste mark of the same name. नंखर पाणी मिळिवलते अक्षताच मिश्रण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अत्तच काळांत, म्हणजे शीघ्र-शीघ्र ऑफीसाला पळामस्क असाच काळांत अक्षता कराला वेळ मिळना म्हणून पुढेच तयार करून ठिवलते अक्षताच मिश्रण दुकानांतून घ्याला मिळते.
अक्षय
adjimperishable. perpetual. कद्धीहीं नासनाते. कद्धीहीं असाच.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
त्यंच घरांत दिवसाला कित्तीदन आलेतरीन जेवण वाढतील. त्यंचकडे अक्षयपात्र आहेकी कायकी !
अक्षर
nletter of an alphabet. अक्षरमालांतले एक स्वर / व्यंजन.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कन्नड अणी तेलुगु लिपीच अक्षर पाह्याला जवळ जवळ एक सारख अस्त.
अक्षरमाला
nalphabet. अक्षरसमूह.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
इंग्ळीष भाषाच अक्षरमालांत वीसाव॑र-सहा अक्षर आहे.
अक्षरक्रम
nspellings. अक्षरप्रयोग. गोष्टांतल॑ अक्षरांच बरोरल प्रयोग / क्रम.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दक्षिणी मराठी बोलणार लोके त्यंच भाषा देवनागरी लिपींत लिव्हाच दंडक पूरा पूरा सोडूनटाकलाहेत्यामळे अत्ता ते लिव्हाला प्रयत्न करताना अनेक गोष्टांच अक्षरक्रम कस॑ असत॑/अस्त॑ म्हणून त्यांस बरोर कळून येत नाही.
अक्षरप्रयोग
nspellings. अक्षरक्रम. गोष्टांतल॑ अक्षरांच बरोरल प्रयोग / क्रम.
अक्षरसमूह
nalphabet. अक्षरमाला.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च देशांत असाच पोणावांटा भाषाचीन अक्षरसमूह ध्वनिशास्त्रानुसार असामळे एक गोष्ट बरोरल अक्षरक्रमांत / अक्षप्रयोगांत लिव्हाला येत॑.
Note
- (1) अक्षरक्रम / अक्षरप्रयोग, spellings. (2) ध्वनिशास्त्र, phonetics.
अक्षराभ्यास
nlearning of the alphabets. अक्षरमाला शिकणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
सरकारी नियमाप्रकार लेंकरांला साळेंत मिळिवाला त्यांस उणे पक्षा सहा वर्षाच वय झाल असाम म्हणून आहे तरीन, पोणावांटादनीन त्यंच लेंकरांला चार पांच वर्ष असतानाच अक्षरमाला शिकिवाला आरंभ करूनटाकतात.
अक्षराभ्यास
nthe ceremony of initiating a child to education. लेंकरांस लिव्हणे-वाचणेंत प्रारंभ करिवाच सण. विद्यारंभ.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हिंदू धर्म संप्रदायाप्रकार नवरात्री सणाच शेवटल॑ तीन दिवस सरस्वतीपूजा आचरण करताना तज शेवटल॑ दिवसी म्हणजे, विजयदशमीच दिवसी लेकरांस अक्षराभ्यास शुभकार्य आरंभ करिवणे आहे.
अक्षौहिणी
na huge army formation of foot soldiers, cavalry, chariots and elephants of ancient times. जुनेकाळच सैन्यांच एक महासंग्रह.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
महाभारत युद्धांत पांडवांच सैन्यांत सात अक्षौहिणी अणी कौरवांच सैन्यांत अक्रा अक्षौहिणी होत॑ म्हणून महाभारत महाकाव्याच आदिपर्वांत आहे.
Note
- according to Adi Parva 2.15-23 of Mahabharatha one akshauhini consists of 21,870 elephants, 21,870 chariots, 65,610 horses and 1,09,350 foot soldiers.
अज्ञात
adjincognito. anonymous. स्वंत रूप कोणालीन दाखिवनास्क.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
बारा वर्षाच वनवास झाल नंतर पांडव एक वर्ष अज्ञातवास विराटराजाच अधीनांत केले.
Note
- ज्ञान knowledge - ज्ञात that which is known - अज्ञात that which is unknown.
अं the second swaraadi in Dakshini Marathi denoted by the dot above the letter; it is called "anuswara". दक्षिणी मराठी अक्षरमालाच दुसरं स्वरादी. अंक
na numerical figure. numeral(s) of a number. अंक.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अरबी-अंक म्हणून पश्चिम देशांत बारावां शतकांत प्रसिद्ध झालते संख्यामाला वास्तव होऊन भारतांत फार जुने काळांतेच प्रयोगांत होत॑.
अंक
nan act of a play or drama. नाटकाच भाग.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
नाटकांत एक-एक अंक आरंभ होतानहीं संपतानहीं वेदीच पर्दा घालणे अणी काढणे होत अस्त.
अंगठा
nthumb. अंगुठा. हाताच मोठ बोट ; आंगठा / अंगठा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
श्स्त्र-विद्यांत अर्जुनाच बरीस कोणीन असताने म्हणून एकलव्याकडून तज अंगठा कापून गुरुदक्षिणा म्हणून द्याला द्रोणाचार्या विचारले.
Note
- from अंगुष्ठ in Sanskrit.
अंगठा
nthe great toe. अंगुठा. पांयाच मोठ बोट ; आंगठा / अंगठा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
नियंत्रण नाहीस्क होतते डयबीटिसामळे मझ अम्माच गॅगरीन झालते अंगठा ऑपरेषन करून काढूनटाकले.
अंगण
ncourt-yard. घराच पुढच नाहीतर मध्य भागांतल मोकळ (उघड) ठिकाण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
साधारण होऊन घरच अंगणांत तुळसी-ब्रिन्दावन अस्त.
अंगप्रदक्षिणा
ncircumambulation performed by rolling on the floor in the prakara of the sanctum sanctorum of a temple in fulfillment of a vow. नवस पालन कराला देऊळाच गर्भगृहाच भोंताले असाच प्राकाराच भोंईंत साष्टांग लोळून प्रदक्षिणा करणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
तिरुपतींत मझीं मझ थोरळे भाऊचीं मुंज झालतम्हा अम्ही दोघीन देऊळाच गर्भग्रहाच (गर्भगुडीच) प्राकारांत अंगप्रदक्षिणा करलों.
Note
- the SM word लोटांगण (लोटणे+अंगण)means "Proceeding (to a place of pilgrimage, a temple &c.) by rolling one's self over and over and obtaining religious merit".
अंगरका
nshirt. अंगर्का. अंगरखा. अंगी. दादिगे / दाद्ग्ये मादाच वरल॑ भागांत नेसाच वस्त्र ; अंगरखा / अंगराखा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
केम्हीन मी पॅन्ट शिंपीकडून शिवून घेतों अणी अंगरका दुकानांतून रेडीमेडाच घेतों.
Note
- better अंगरखा.
अंगरखा
nshirt. अंगर्का. अंगरका. अंगी. दादिगे / दाद्ग्ये मादाच वरल॑ भागांत नेसाच वस्त्र ; अंगरखा / अंगराखा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्ही लेंकरे असताना दोनकी तीनकी गुंडी असाच अंगरखा डोस्के वरून घालास्क शिवत होते. अत्ता हे काळाच अंगरखाला पांचकी सहाकी गुंडी अस्त अणी ते पुढे पटीस पूरा उघड॑ अस्त म्हणून डोस्केच वरून घालाच आवश्य नसते.
Note
- from अंग (torso) and राखणे (to protect).
अंगर्का
nshirt. अंगरका. अंगरखा. अंगी.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
रेडीमेड अंगर्का घेताना केम्हाहीन मला थोडक पाव्हून घेमतेस्क अस्त, कां म्हणजे चाळीस अथवा चाळीसाव॑र-दोन नंबराच अंगर्काच मला बरोर पडेल, पण दर कंपनीच चाळीस अणी बेचाळीस नंबरांत व्यत्यास अस्त.
Note
- better अंगरखा.
अंगवस्त्र
ncloth covering torso of a man. upper cloth. अंगोस्त्र. अंगोस्तर. अंगूस्त्र. दाद्ग्ये आंगाच वरच भागावर पांघरिवून नेसाच कापड.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) पूजा, अथवा अणखि काहीं शुभकार्य करतानादादिगे / दाद्ग्ये अंगवस्त्र अणी वेष्टी / धोती नेसूनेच कराम / करांव अस आहे. (2) केरळच देऊळांत जाताना अंगी अणी पॅन्ट नेसाला सोडनात. तज बद्दिल वेष्टी / धोती अणी अंगवस्त्र नेसाम / नेसांव.
Note
- 1. from अंग (body) and वस्त्र cloth). 2. अंग" means "limb", and by extension, "body"; hence अंगवस्त्र. 3. . Note. better अंगवस्त्र.
अंगारा
nsacred residue of coal cinders after saligrama puja and offering of nevedya to Lord Narayana. साळिग्राम पूजा अणी नेवेद्य / नैवेद्य झाल नंतर सगडींत अथवा होमकुंडांत शांत झालते कोळसा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मध्व संप्रदायाच दादिगे त्यंच आंगांत गोपीचंदन लावलते ठिकाणी अंगारा लावतात.
Note
- the sacred cinder is applied wherever gopichandana has been applied on their body by Madhva brahmin men.
अंगी
nman's shirt. अंगर्का. अंगरका. अंगरखा. दादिगे / दाद्ग्ये मादाच वरल॑ भागांत नेसाच वस्त्र.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अनंतशयन श्री पद्मनाभास्वामी देवस्थानाच आंत दर्शन कराला जाम / जांव म्हणजे दादिगे त्यंच अंगी उकलून धोती नेसींगून जाम / जांव.
अंगीकार
nespouse. acknowledge. admit. agreement, acceptance etc. सम्मत / संमत.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
ऐक्य राष्ट्र संघटनाच (UNO) अंगीकार झाल नंतर अमेरिका इर्राक युद्ध आरंभ केले.
अंगुठा
nthumb. अंगठा. हाताच मोठ बोट ; आंगठा / अंगठा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
श्स्त्र-विद्यांत अर्जुनाच बरीस कोणीन असताने म्हणून एकलव्याकडून तज अंगूठा कापून गुरुदक्षिणा म्हणून द्याला द्रोणाचार्या विचारले.
Note
- from अंगुष्ठ in Sanskrit.
अंगुठा
nthe great toe. अंगठा. पांयाच मोठ बोट ; आंगठा / अंगठा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
नियंत्रण नाहीस्क होतते डयबीटिसामळे मझ अम्माच गॅगरीन झालते अंगुठा ऑपरेषन करून काढूनटाकले.
अंगूस्त्र
ncloth covering torso of a man. upper cloth. अंगवस्त्र. अंगोस्तर. अंगोस्त्र. दाद्ग्ये आंगाच वर पांघ्रिवून / पांघरिवून नेसाच कापड.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दादिगे अनंतशयन श्री पद्मनाभस्वामी देवस्थानाच आंत वेघाम म्हणजे अंगी काडूनटाकाम.
Note
- better अंगवस्त्र.
अंगोठी
nfinger ring. मुदी ; आंगठी in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
साधारण होऊन अंगोठी डाव॑ हातांतल॑ चौथी बोटांत घालतों.
Note
- चौथी बोटाला "अनामिका" म्हणतात.
अंगोस्तर
ncloth covering torso of a man. upper cloth. अंगोस्त्र. अंगू्स्त्र. अंगवस्त्र. दाद्ग्ये आंगाच वर पांघ्रिवून / पांघरिवून नेसाच कापड.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
बंगळूरांत पेजावरश्री यांच विद्यापीठांत असाच श्री राघवेन्द्रस्वामीला कनकाभिषेक कराच एक-एकदनांसीन मंत्राक्षताच बरोर अंगोस्त्रर सम्मानास्क देतील. .
Note
- better अंगवस्त्र.
अंगोस्त्र
ncloth covering torso of a man. upper cloth. अंगवस्त्र. अंगोस्तर. अंगूस्त्र. दाद्ग्ये आंगाच वर पांघरून नेसाच कापड.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
आंगावर अंगोस्त्र नोको म्हणून अस्ताना कित्येकदन ते काडून माद / माज गुंडाळींगून बांदींगतील / बांदतील.
Note
- better अंगवस्त्र.
अंघूळ
nbathing. पाणींत आंग धुवून शुद्ध करणे. अंघोळ. अंघोळी. आंघूळ. आंघोळ. स्नान. नाहणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अंघूळ कराच खोलीला नाहणी म्हणतों.
Note
- the different spellings of अंघूळ are as per J.T. Molesworth's A Dictionary of Marathi English (1857).
अंघोळ
nbathing. पाणींत आंग धुवून शुद्ध करणे. अंघोळी. अंघूळ. आंघोळ. आंघूळ. स्नान. नाहणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
खेडेगांवांच लोके अंघोळ कराला कुंड नाहीतर / अथवा नदीला जाणे आहे.
अंघोळी
nbathing. पाणींत आंग धुवून शुद्ध करणे. अंघोळ. अंघूळ. आंघोळ. आंघूळ. स्नान. नाहणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दीपावळी सणाच वेळी चूलीच हंडा बेष घांसून तला हळदी-कुंकू लावून त्यांतल॑ तावलते पाणीच बरोर नंखर गंगाजल ओतून अंघोळी करणे आहे.
Note
- taking bath in water containing some Ganga-jal is said to bestow the benefits of taking bath in river Ganga.
अंजली
noffering made with palms held together to form a cup. वाटीच आकारांत दोन हात जोडून अर्पणा करणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
फूल दोन हातांतीन काढून अंजली द्याचाला पुष्पांजली म्हणतों.
अंजीर
nfig. fruits or the tree/plant bearing the fruit. अंजीर फळ अथवा ते फळाच झाड.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
वाळतां वाळतां अंजीर पंडूच गुळचीटपण जास्ति होत जाईल.
अंड
negg. अंडे. मुट्टे (Tamil) ; अंडे /अंडी in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कोंबडेच अंड दिवसोडी एक एक खालतर आंगाला चोखट / चोखोट म्हणतात.
अंडे
negg. अंडे. मुट्टे (Tamil) ; अंडे / अंडी in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
कॉलेज हॉस्टलांत मझ मित्र एकला होता. तो दिसोडी तीन अंडेच ओमलेट विना वेगळ काहीन पाष्टेच पलहाराला खायना.
अंत
nend. अवसान. शेवटी /शेवट
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) ब्रह्मांडाच अंत कस होईल हे कोणालीन योचना कराला होइनाच होइना. (2) म्हातारे लोके प्रति वेळीन प्रत्येक-प्रत्येक पदार्थ करांव / कराम, नीट तूप-तेल घालून केलते भाजी असाम, दुपारच "टिफ़्फ़िनांत" गुळ्चीट ठिवाम / ठिवांव, भक्षाच तुकडांत घम्मशी वास असांव अस विचारचाला अंतेच असना.
अंतकरण
ndeep seated compassionate feeling, affection, conscience etc. गाढ करुण्याच अणि तजजोक्तल॑ भावना.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) मझ॑ सत्तराच-व॑र-पांचवां उजलादिवसी मझ॑ मामि मला फार लाडान, अंतकरणांत एक आहेर देले. (2) तो एक क्रूर मनुष. दूसरेंच विषीन तला अंतकरण काहींनेच नाही.
अंतकाल
nlast days before death. मराच पुढले समय.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दिव्यज्ञान असणारांस त्यंच अंतकाल कळेल म्हणून सांगतात.
अंतकाल
nlast days. शेवटलच थोड दिवस.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मुगळ साम्राज्याच अंतकाल झाल नंतर अम्च देशाच एक मोठ भाग मराठांच स्वाधीनांत आल॑.
अंतरपट
nthe ceremonial curtain held between the bride and the groom before tying the mangalasutra in a Hindu wedding. वराडाच वेळी गरसोळी बांधाच पुढे नवरा-नवरींच मध्य अडवे धराच पर्दा ; अंतरपाट in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
गरसोळी बांधाच पुढे "शुभ लग्ने सावधान" म्हणाच मंगळाष्टक सांगून संपिवून अंतरपट उतरिवितांतरून नवरा नवरी एक-दुसरेंच डोस्केव॑र अक्षता घालाच संप्रदाय आहे.
अंतरात्मा
nthe sentient soul. जीवात्मा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अंतरात्माचीं देहाचीं योग कस कराच, हे रहस्य जुने काळ पसून ऋषीनीं-मुनीनीं योगाभ्यास वाटे प्रसिद्ध केल्होते.
अंतरीक्ष
natmosphere. वायुमंडल.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
एक ग्रहांत जीव उद्भव / उत्पत्ति होयाला तज आवश्य प्रकारच अंतरीक्ष अवश्य पह्जे.
अंतर्ज्ञान
ninner (spiritual) knowledge. दिव्यज्ञान.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अंतर्ज्ञान वाढिवणे, हे धर्माच एक प्रधा्न उद्धेश आहे.
अंतिम
adjfinal. शेवटीच. शेवट्ल॑.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
विनायक चतुर्थीच दिवसी गणेशाच विग्रहाला विसर्जन कराच ते दिवसच अंतिम कार्यक्रम आहे.
अंत्यकर्म
nlast rites done for departed soul. मरलत्यांच शेषक्रिया.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हिंदू धर्म प्रकार देह सोडून परलोकाला जायाच आत्माच मोक्षाकरतां अम्ही कराच अंत्यकर्मांत वैकुंठसमाराधना एक मुख्य भाग आहे.
अंत्ययात्रा
nfuneral journey. अंतिमयात्रा. मरलत्यांच शिरीर स्मशानाला घेऊन जायाच यात्रा.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
विध-विध आचार-विचार अनुसरण करणार लोके, मृतदेहाच अंत्ययात्रा त्यंच-त्यंच वर्गाच दंडकाच प्रमाण करतील.
अंथरणे
vtto spread a sheet, mat or bedding. (निजाला अथवा भोईं वर बसाला) जमखाण, चांपा, अंथरूण पसरणे.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
जानवासाच दिवस लोकांस बसाला जमखाण अंथरूण ठिवाला / अंथराला मी नवरीच घरचे लोकांस सांगिट्लों.
अंथरूण
nmattress. निजाला उपयोग कराच कापूस अथवा फोम भरलते लेप. अण्थूण. लेप. नाहिली.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
वसति /सौकर्य जास्ती नाहीते लोकांच घरांत पाष्टे अग्गीन अंथरूण गुंडाळून एकपटीस ठिवतील अणी रात्रि निजाच वेळी ते काढून कोठ सौकर्य आहेकी तिकडे अंथरतील.
अंथरूण-पांघरूण
na full set of bed with mattress, blanket, pillows etc. अण्थूणाचीं पांघरिवणाचीं पूरा व्यवस्था.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अम्च घरांत चार लोकांला निजाला अंथरूण-पांघरूण सदा अस्त.
अंधळ॑
adjblind. डोळे दिसनाते व्यक्ति ; आंधळा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) अम्च गांवांत अंधळ लेंकरांस शिकिवाला एक साळे / शाळे उघडाच विषय बोलून तीन वर्षाच नंतर ते निज / खरे झाल॑. (2) मी ल्हान अस्ताना अम्च घराला एक अंधळ भीकारी वारा-वार येत होतते अत्ता पणीन मझ सयेंत आहे.
अंधविश्वास
nsuperstition. अंधविश्वास. अलौकिक अणी अतिंद्रिय विषय. वैज्ञानिक आधार नाहीस्क कराच विश्वास.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
(1) डाव॑ हातांत घालिंगाच ग्ळोव अणि उजव॑ हातांत घालिंगाच ग्ळोव हे दोनीन वेगळ॑-वेगळ॑ रीतीच असलतर क्रिकट खेळताना चोखोट भाग्य मिळेल अस॑ एक अंधविश्वास एक सुप्रसिद्ध विकट-कीपराला होत॑. (2) शिकार कथांच सुप्रसिद्ध लेखक श्री केन्नत ॲन्डेरसन भूत-प्रेत-पिशाच असलते अंधविश्वासाच विषय आस्पद करूनपणीन एक दोन पुस्तक लिव्हलाहेत. Note अंधश्रद्धा, अतिंद्रिय, लोकभ्रम in SM.
अंधार
ndarkness. उजाड नाहीस्क असाच स्थिती.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
अत्ता अस्कीन दिवसाला तीनदपा "पवर-कट" होत आहे. रात्रीच वेळ अंधारांत लेंकरांस वाचाला उदंड कष्ट होत म्हणून मी एक इनवर्टर घेट्लों.
अंबट
adjsour. अंबट रूच. अंबट स्वाद. ; आंबट in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
भरून अंबट स्वादाच अंबांतून केलते लोणचे फार रूच अस्त !
Note
- in SM the word रूच is also used to denote relish, liking, delight in anything.
अंबटकोळ्ळि
adjextremely sour. उदंड अंबटाच.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हे दहीं मला वाढ नको. उन्हाळांत ते अंबटकोळ्ळि झालाहे !
अंबटभाजी
na liquid preparation usually made of greens or cabbage or pumpkin eaten with cooked rice. पाला (कीरे-Tamil) अथवा कॅबेज अथवा भोंपळाच कालवण.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
दक्षिणी मराठी लोकांला सगळ्यांचीन पक्षा अवडाच कालवण अंबटभाजी म्हणून संशय नाहीस्क सांगूया.
अंबा
nmango. एक फळाच नाव ; आंबा in sm.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
हिरव॑ / हिर्व असताना, म्हणजे पिकनास्क असताना फार अंबट असाच अंबाच वर्ग पंडू झाल॑ नंतर, म्हणजे पिकला नंतर फार गुळचीट होईल.
Note
- पंडू, meaning "a ripe fruit" is a loan-word from Telugu.
अंबा
nGoddess Durga. दुर्गादेवी.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पार्वती देवीला, अंबा, दुर्गा, ललिता अस अनेक रूपांत हिंदू लोक आरधना करतात.
अंबारी
ncaparisoned and canopied seat on an elephant used during ceremonial processions. उत्सवाच मिरवणी करताना हत्तीच पाठीवर बसाला म्हणून बांधलते छत असाच अलंकार केलते व्यवस्था.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
मैसूर दस्सराच वेळी चामुंडी देवीच विग्रह अंबारी बांधलते हत्तीच वर ठिवून जंबू-सवारी कराच दृश्य तिकडल॑ उत्सवाच एक मुख्य भाग आहे.
Note
- (1) The word "अंबारी" is used in Marathi and in some other Indian languages also and has a complex etymology. (2) हौदा is a secure, practical seat without a canopy mostly used in wildlife tourism.
अंश
na portion. a part. भाग. चूर.
Used in a sentence · वाक्य प्रयोग
पांडवांला देशाच एक ल्हान अंश पणीन द्याला दुर्योधना तयार न्होता.